Crime: पत्रकार म्हणून मिरवलं, पण डान्स बारने सारं काही हिरवलं; पैशासाठी…
Kalyan Crime: झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी एक उच्चशिक्षित तरुण पत्रकाराने थेट चोऱ्या करण्यास सुरुवात केली. आता कल्याण पोलिसांनी या चोऱ्याचा मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
Kalyan Crime News: कल्याण: मास मीडियापर्यंत शिक्षण घेतलं, एका प्रसिद्ध वृत्तपत्रात नोकरीला लागला, मात्र याच दरम्यान त्याला डान्स बारचे (Dance Bar) व्यसन लागले आणि झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला. हा तरुण भरदिवसा बंद घरे हेरून घरोफोड्या करायचा. या सराईत चोरट्याचा (thief) शोध घेताना पोलिसांची देखील बरीच दमछाक झाली. कारण महिनाभर पोलीस या चोराच्या मागावर होते. मात्र, तो त्यांना सातत्याने गुंगारा देत होता. अखेर खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करत या चोरट्याला बेड्या ठोकल्या. (kalyan crime young journalist turned into a thief because of his addiction to dance bars gold worth lakhs of rupees was seized by the police)
ADVERTISEMENT
रोशन जाधव असे या चोरट्याने नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 47 तोळे सोन्याचे दागिने, मोबाइल, लॅपटॉप, महागडी घड्याळे, हस्तगत केली आहेत. चोरलेला ऐवज आणि पैसे रोशन हा डान्स बारमध्ये उधळत असल्याचं समोर आलं आहे.
पत्रकार ते सराईत चोरटा… भामटा कसा सापडला पोलिसांच्या तावडीत?
मागील काही महिन्यात कल्याण आणि जवळच्या परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यातच मोहने परिसरात एका चोरट्याने घरफोडी करत तब्बल 35 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र ज्या इमारतीमध्ये चोऱ्या झाल्या त्या ठिकाणी सीसीटिव्ही नसल्याने पोलिसांसमोर या चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले होते. या पार्शवभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा शोध सुरू केला.
हे वाचलं का?
अधिक वाचा- बॉयफ्रेंडला घरी बोलावून सासू-सासऱ्यांची हत्या,पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा
खडकपाडा पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक फुटेजच्या आधारे अखेर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. रोशन जाधव असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांना त्याच्याकडून मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर या भागातील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून रोशनकडून पोलिसांनी 47 तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल, महागडी घड्याळं असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक वाचा- बायकोचा राग थेट ‘खाकी वर्दीवर’; पतीची पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
धक्कादायक बाब म्हणजे रोधन जाधव हा उच्च शिक्षित असून त्याने मास मीडियापर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर काही वर्ष एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात कामही केलेलं. पण याच दरम्यान त्याला डान्स बारचा नाद लागला. त्यासाठी त्याला पैशांची कमतरता भासू लागल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. दिवसा वॉचमन व सीसीटिव्ही नसलेल्या छोट्या इमारती शोधायच्या व बंद घरे हेरून घराचे टाळे तोडून तो घरफोडी करायचा. गेल्या काही वर्षापासून तो घरफोड्या करत होता. अखेर आता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT