Viral Video: जळत्या फटाक्यावर बसला अन्..., तरुणाने पैज लावली अन् गमावला जीव; थरार कॅमेरात कैद

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने पैज लावली अन् गमावला जीव

point

नेमकं प्रकरण काय? 

point

मृत्यूचा थरार कॅमेरात कैद! सोशल मीडियावर Video Viral

Bengluru Viral Video : मैत्रीला काळीमा फासणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर मित्रांच्या अशा खोड्या जीवही घेऊ शकतात यातून हेच लक्षात येईल. बंगळुरूमधील कोनानकुंटे परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फटाके फोडताना काही तरुणांच्या पैजेमुळे एका 32 वर्षीय शबरिश नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. (karnataka bengaluru friends challenged 32 years old man to sit on firecracker he accepted the challenge and then died

ADVERTISEMENT

31 ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडणाऱ्या मद्यधुंद तरुणांनी फटाक्यावर एक बॉक्स ठेवला. आरोपींनी शबरिशसोबत पैज लावत त्याला फटाक्यांवर बसण्यास सांगितले. मात्र फटाक्याच्या स्फोटानंतर शबरिशचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : Sharad Pawar : बारामतीच्या कारभाऱ्यासाठी 30-30 चा फॉर्म्युला... युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत काय म्हणाले शरद पवार?

नेमकं प्रकरण काय? 

'जर तू जळत्या फटाक्यावर बसला तर तुला ऑटोरिक्षा घेऊन देऊ' अशी जीवघेणी पैज काही मित्रांनी मिळून मृत 32 वर्षीय शबरिशसोबत लावली होती. नशेच्या अवस्थेत मृत शबरिशनेही यासाठी होकार दिला. तो जळत्या फटाक्यावर बसला, पण त्यानंतर तो गंभीर जखमी झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Todays Gold Price : सोन्याला भारी डिमांड आली! आज स्वस्त की महाग? पाहा 1 तोळ्याचे भाव... 

डॉक्टरांनी सांगितले की, स्फोटामुळे त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर खोलवर जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT