Kolhapur : मुंबईच्या पराभवामुळे चिडला, चाहत्याने चेन्नईच्या फॅनचाच घेतला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

kolhapur crime news mumbai fan killed chennai team fan mumbai indians and sunrises hyderabad kolhapur news
आयपीएल सामन्यातील वादातून मुंबईच्या चाहत्याने चेन्नईच्या चाहत्याच्या डोक्यात लाकूड घातलं होतं.
social share
google news

Kolhapur Crime News : देशभरात सध्या आयपीएलची क्रेझ आहे. या स्पर्धेवरून अनेक चाहत्यांमध्ये वादविवाद होत असतात. अशाच एका वादातून एका चाहत्याचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की आयपीएल सामन्यातील वादातून मुंबईच्या चाहत्याने चेन्नईच्या चाहत्याच्या डोक्यात लाकूड घातलं होतं. या हल्ल्यात चाहता गंभीर जखमी झाला होता.त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बडोपंत तिबिले (वय 65) असे या मृत चाहत्याचे नाव आहे. या घटनेने कोल्हापूर हादरलं आहे.  (kolhapur crime news mumbai fan killed chennai team fan mumbai indians and sunrises hyderabad kolhapur news) 

ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हणमंतवाडीत ही धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात सामना सुरु होता. हा सामना पाहण्यासाठी बंडोपंत तिबिले त्यांच्या घरासमोरील शेजारी शिवाजी गायकवाड यांच्या घरी सामना पाहायला गेले होते. यावेळी तिबिले यांच्यासोबत त्यांच्या शेजारी राहणारा बळवंत झाजंगे देखील उपस्थित होता. 

हे ही वाचा : Ram Satpute : ''शिंदेंनी सोलापूरमधील 12 अतिरेक्यांना वाचवलं'',

दरम्यान सामना अतिरंजक अवस्थेत पोहोचला असतानाच अचानक मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्मा आऊट झाला. शर्मा आऊट होताच गायकवाड यांच्या घरी बसलेल्या चेन्नईच्या चाहता बंडोपंत तिबिले यांनी जल्लोष व्यक्त केला. हा जल्लोष मुंबईच्या चाहता असलेल्या झाजंगे यांना काही पचला नाही. आणि दोघांमध्ये सामन्यातून वादावादी झाली आणि या वादाचे रूपांतर पुढे जाऊन मारहाणीत झाले. 

हे वाचलं का?

सामन्यावरून झालेल्या वादावादीत बळवंत झाजंगेने बडोपंतच्या मुलाचा गळा पकडून त्याला मारहाण करण्यास सूरूवात केली. त्यानंतर बळवंत यांचा पुतण्या सागर झाजंगे याने मागून येऊन बंडोपंत तिबिले यांच्या डोक्यात लाकडाने जोरदार वार केला. या हल्ल्यात बंडोपंत जमिनीवर कोसळले. त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. यानंतर तत्काळ नातेवाईकांनी त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र बंडोपंत यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवार त्यांचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा : India Rally : "400 काय 180 चा टप्पाही...", राहुल गांधींचं भाजपबद्दल मोठं भाकित

या प्रकरणी आता बंडोपंत यांच्या कुटुंबियांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सागर सदाशिव झाजंगे व बळवंत महादेव झाजंगे यांना अटक करण्यात आली आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT