Latur: सहा वर्षाच्या लेकीसह बापाने स्वत:ला संपवलं, लातूरमधल्या प्रकरणात असं काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Latur Crime News : लातूरमधून (Latur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 35 वर्षीय बापाने त्याच्या 6 वर्षांच्या लेकीला शाळेतून आणल्यानंतर गळा घोटून संपवलं आहे. यानंतर त्याने स्वत:ही गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. (Latur Crime News a 35 years old father killed his 6 years daughter after that he also did suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लातूर शहरातील मोती नगरमध्ये घडली आहे. येथे राहणारा अभय लक्ष्मीनिवास भुतडा हा शहरातील कोरे गार्डन समोर हॉटेल चालवायचा. त्याच्यासोबत त्याची 6 वर्षांची मुलगी राहत होती. त्याने मुलीला शाळेतून घरी आणले, त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांनी पाहिल्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला.

हा भयानक प्रकार पाहता कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घटनेच्या वेळी मृत अभयची पत्नी कुठे होती? 

अभय लक्ष्मीनिवास भुतडा याने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली. यावेळी अभयची पत्नी घरी उपस्थित नव्हती असे सांगितले जात आहे. माहितीनुसार, अभयची पत्नी काही दिवसांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती. या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करून घटनेचा तपास करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT