Sanjeev Jeeva: थेट कोर्टातच केली अतिकसारखी हत्या, गँगस्टरच्या डोक्यातच झाडल्या गोळ्या
Sanjeev Jeeva Murder Court: लखनऊमध्ये एका गँगस्टरची थेट कोर्टरुममध्ये घुसूनच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय.
ADVERTISEMENT
Sanjeev Jeeva Murder: उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये वजीरगंज येथे थेट कोर्टात घुसून एका कुख्यात गँगस्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच अतिक अहमद या कुख्यात गुंडाची पोलिसांच्या ताब्यात असताना संपूर्ण मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. असं असताना आता थेट कोर्टात घुसून केलेल्या हत्येमुळे उत्तर प्रदेश पुन्हा एकदा हादरून गेला आहे. मारेकरी हा वकिलाच्या पेहरावात आला होता आणि त्याने कोर्टात घुसून बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात संजीव जीवा (Sanjeev Jeeva) हा जागीच ठार. पण यावेळी एक मुलगी आणि एका महिलेलाही गोळी लागली असल्याचं समजतं आहे. या घटनेनंतर एका गोळीबाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना घडवणाऱ्या हल्लेखोराचे नाव विजय यादव असे असून तो जौनपूरमधील केरकटचा रहिवासी आहे. (lucknow gangster sanjeev jeeva shot dead court lawyer uttar pradesh crime yogi government)
ADVERTISEMENT
लखनऊ दिवाणी न्यायालयाबाहेर ही घटना घडली आहे. संजीव जीवा माहेश्वरी असे मृताचे नाव असून तो पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया आहे. गोळी लागल्याने संजीवचा जागीच मृत्यू झाला. संजीव यांच्यावर भाजप नेते ब्रह्मदत्त दिवेदी यांच्या हत्येचा आरोप होता. याशिवाय इतरही अनेक प्रकरणांमध्ये तो आरोपी होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी आहे.
हे वाचलं का?
जीवा होता मुख्तार अन्सारीचा शूटर
संजीव जीवा हा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा रहिवासी होता. मुख्तार अन्सारीसोबत त्याचे कनेक्शन होतं. तो मुख्तारचा शूटर होता. प्रसिद्ध कृष्णानंद राय खून प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले होते. संजीव हा काही दिवसांपासून लखनऊ तुरुंगात बंद होता. पण आज (7 जून) जेव्हा त्याला कोर्टात आणण्यात आलं तेव्हाच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
हे ही वाचा >> Basti Rape Case: 12 वर्षाच्या मुलीवर गँगरेप! भाजप कार्यकर्त्याने घरी बोलावलं आणि नंतर…
90 च्या दशकापासून जीवा होता गुन्हेगारीशी संबंधित
संजीवच्या गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करण्याबद्दल सांगायचे तर, त्याने 90 च्या दशकात आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्याने सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनामध्ये आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली होती.
ADVERTISEMENT
मागितलेली 2 कोटी रुपयांची खंडणी
संजीव हा त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कंपाउंडर होता. काम करत असतानाच त्याच्या मनात गुन्हेगारी विश्वाविषयी ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे संजीवने दवाखाना चालकाचे अपहरण केलं होतं. यानंतर त्याचा उत्साह वाढत गेला आणि 90 च्या दशकात जीवाने कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. ही घटना घडल्यानंतर त्याने खंडणीच्या बदल्यात दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. दोन कोटी मागणे ही त्याकाळी खूप मोठी गोष्ट होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> चोरट्याला फुटला पाझर, 9 लाखांचं सोनं पुन्हा घरासमोर ठेवलं आणून; अन् म्हणाला…
त्यानंतर संजीव जीवाने हरिद्वारच्या नाझीम टोळीत घुसखोरी केली. यानंतर तो सतेंद्र बर्नाला टोळीत सामील झाला. मात्र, वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम करूनही संजीवचे समाधान झाले नाही आणि त्याने स्वत:ची टोळी तयार करण्याचा निर्णय घेतला.
मुख्तार अन्सारीच्या संपर्कात कसा आला?
10 फेब्रुवारी 1997 रोजी भाजप नेते ब्रम्हा दत्त द्विवेदी यांच्या हत्येतही संजीव जीवाचे नाव होते. या खून प्रकरणात जीवाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या मोठ्या घटनेनंतर तो मुन्ना बजरंगी गँगमध्ये सामील झाला होता. यादरम्यान तो मुख्तार अन्सारीच्या संपर्कात आला.
असं म्हटलं जातं की, मुख्तार अन्सारीला नवनवीन शस्त्रास्त्रांचा शौक होता. संजीव जीवा आपल्या युक्तीने ही शस्त्रे हाताळण्यात माहीर होता. त्यांच्या या खास वैशिष्ट्यामुळे संजीवला मुख्तारचे संरक्षण मिळाले. यानंतर कृष्णानंद राय खून प्रकरणातही जीवाचे नाव पुढे आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT