Video :झिंज्या उपटल्या, लाथा-बुक्यांनी मारलं, महिला पायलटला जमावाने मारहाण का केली?

प्रशांत गोमाणे

दिल्लीच्या (Delhi) द्वारका परिसरात एका पायलट महिलेला (pilot Women) जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिलेला तिच्याच घरातून केस ओढून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर रस्त्यावर खेचत जमावाने बेदम मारहाण केली.

ADVERTISEMENT

Dawarka made minor girl beat and tortured pilot couple in delhi pilot women Video viral
Dawarka made minor girl beat and tortured pilot couple in delhi pilot women Video viral
social share
google news

दिल्लीच्या (Delhi) द्वारका परिसरात एका पायलट महिलेला (pilot Women) जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिलेला तिच्याच घरातून केस ओढून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर रस्त्यावर खेचत जमावाने बेदम मारहाण केली. या दरम्यान बायकोला वाचवायला मध्ये आलेल्या तिच्या नवऱ्याला देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. आता तु्म्हाला प्रश्न पडला असेल या दाम्पत्याला जमावाने मारहाण का केली? तर या संपूर्ण प्रकरणामागे एक 10 वर्षीय मुलगी आहे. नेमकं या मुलीसोबत दाम्पत्याने काय केले आहे? व दाम्पत्याला जमावाने मारहाण का केली? हे जाणून घेऊय़ात. (made minor girl beat and tortured pilot couple in delhi Video viral)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कौशिक बागजी (36) हे एका खाजगी एयरलाईन्समध्ये ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी पूर्णिमा बागची (33) दुसऱ्या एका एय़रलाईन्समध्ये पायलट होती. दोघांनी त्यांच्या घरी एका 10 वर्षीय मुलीला घरकामासाठी ठेवले होते. या चिमुकलीला हे दाम्पत्य मारहाण आणि टॉर्चर करायचे.चिमुकलीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि चेहऱ्यावर सुज देखील आढळली होती. या घटनेची माहिती मिळताच जमावाने मिळून पायलट दाम्पत्याला मारहाण केली.

हे ही वाचा : Manipur: जमावाकडून महिलांची नग्न धिंड, गँगरेप आणि खून… मणिपूरमध्ये काय घडलं?

10 वर्षीय मुलीला दाम्पत्य मारहाण करत असल्याची घटना तिच्या नातेवाईकाने पाहिली होती. त्यामुळे नातेवाईकाने त्यांच्या ओळखीच्या नागरीकांना घेऊन दाम्पत्याचे घरं गाठलं होतं. यावेळेस पायलट पूर्णिमा बागची या कामावरून घरी आल्या होत्या. यावेळी जमावाने पायलट महिलेची केस ओढत तिला घराबाहेर काढले, त्यानंतर रस्त्यावर नेत तिला बेदम मारहाण केली होती. या महिलेल्या वाचवायला आलेल्या तिच्या पतीला देखील मारहाण केली गेली. या घटनेत एका वृद्ध व्यक्तीने हस्तक्षेप केल्यानंतर ही घटना मिटली.

हे वाचलं का?

    follow whatsapp