मामाच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार, आईनेच मुलाविरोधात दाखल केली तक्रार; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका तरुणाने आपल्या मामाच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईनेच त्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मामाच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार

point

आईनेच मुलाविरोधात दाखल केली तक्रार

point

नेमकं काय घडलं?

Crime News : मामाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका मुलावर त्याच्याच आईने गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती समजताच आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आईचा मृत्यू झाल्यानंतर पीडिता आपल्या आत्याकडेच रहात होती. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. यामुळे चिडलेल्या आईने आपल्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

आईनेच मुलाविरोधात दाखल केली तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मामाच्या मुलीसोबत गोड बोलून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसानंतर ती गर्भवती झाली. यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार तिच्या आत्याला सांगितला. यानंतर आरोपीच्या आईने आपल्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आईच्या मृत्यूनंतर पीडिता आत्याकडे रहायला आली होती. तिच्या वडिलांना असलेल्या वाईट सवयींमुळे आत्याने तिला आपल्या घरीच ठेवले होते. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : गोड बोलून हॉटेलमध्ये बोलावलं, अन् 25 वर्षीय तरुणीचे 16 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध

फसवून शारीरिक संबंध

पीडिता लहानपणापासूनच तिच्या आत्याकडे रहात आहे. आरोपीच्या आईने आरोप केला आहे की, आरोपीने पीडितेला फसवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर ती गर्भवती झाली. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन दिले आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, लग्नाच्या वरातीत दोन खून, बाप-लेकाची निर्घृण हत्या; नेमकं कारण काय?

पोलिस काय म्हणाले?

आरोपीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की, दाखल झालेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल. दरम्यान, आईनेच आपल्या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्याने परिसरात चर्चा रंगली आहे.
 

हे वाचलं का?