कुऱ्हाडीने वार करून हत्या,नंतर मृतदेहाच्या शेजारीच बसला, नेमकं काय घडलं?
कोतवाली पोलीस (Kotawali police) ठाणे हद्दीतील कर्बला पुलच्या परीसरात सुरज कुशवाहा हा विटा घ्यायला गेला होता. यावेळी तेथे मजूरी करणाऱ्या आरोपीने सुरज कुशवाहावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने पळ न काढता मृतदेहा शेजारीच बसून राहिला.
ADVERTISEMENT
देशभरात हत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक हत्येची घटना समोर आली आहे. या घटनेत एका कामगाराने एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा घटनेत अनेकदा आरोपी हत्या करून फरार होतात.मात्र या घटनेत आरोपी फरार न होता थेट मृतदेहाच्या (Dead Body) शेजारीच बसला होता.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्य़ात घेतले. मात्र या घटनेने मृताचे कुटुंबिय संतप्त झाले आहेत. कुटुंबियांनी मृतदेहाला घेऊन जमावासह रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. (man killed by cutting wih an axe in sahore madhya pradesh)
ADVERTISEMENT
कोतवाली पोलीस (Kotawali police) ठाणे हद्दीतील कर्बला पुलच्या परीसरात सुरज कुशवाहा हा विटा घ्यायला गेला होता. यावेळी तेथे मजूरी करणाऱ्या आरोपीने सुरज कुशवाहावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने पळ न काढता मृतदेहा शेजारीच बसून राहिला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्य़ात घेतले. तसेच हत्येसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
हे ही वाचा : लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!
सुरज कुशवाहाच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण खुपच तापले आहे. मृताच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन थेट मुख्य रस्ता गाठून बस्तान मांडले आहे. तसेच मृताच्या कुटुंबियांनी न्यायासाठी मागणी सुरु केली आहे.त्यामुळे परीसरात तणावपुर्ण वातावरण पसरले होते. तसेच मृताच्या कुटुंबियांच्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृताच्या कुटुंबियांना आरोपीवर कठोर कारवाईचे करण्याचे निर्देश दिल्यानंतर रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता.
हे वाचलं का?
दरम्यान या घटनेतील आरोपीचे मानसिक संतुलन खराब असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी आऱोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीने नेमकी का हत्या केली? याचे कारण पोलिसांना अद्याप सापडले नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये ही घटना घडली आहे.
हे ही वाचा : 50 हजाराची सुपारी अन् भाड्याचे गुंड, बायकोने फुलप्रुफ प्लान करून पतीचा काढला काटा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT