आधी सोशल मीडियावर मैत्री, नंतर प्रेम, नंतर अल्पवयीन मुलीनं जीवच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

minor girl committed suicide consuming poison harassed friend on social media
minor girl committed suicide consuming poison harassed friend on social media
social share
google news

Suicide Case: केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला (minor girl) सोशल मीडियावर (Social media) फसवून तिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फसवून तिच्याबरोबर सोशल मीडियावर मैत्री (Friendship) केली होती. मात्र त्यानंतर ही घटना तिच्या वडिलांना समजली,त्यामुळे तिने त्याच्याबरोबरची मैत्रीही तोडली. त्यानंतर त्या तरुणाने तिला ब्लॅकमेलिंग करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला मानसिक त्रास दिल्याने आणि त्याच्या त्रासाला कंटाळून तिने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली.

ADVERTISEMENT

कंटाळून विषाचे प्राशन

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 16 वर्षाची व दहावीला असलेली विद्यार्थिनी मंगळवारी सायंकाळी बडियाडकामध्ये विष प्राशन केल्याने घरामध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे कोणतीही सुधारणा न झाल्याने तिला मंगळुरूमध्ये हलवण्यात आले.

हे ही वाचा >> ‘महाविकास आघाडीमध्ये नवे मित्र मिळाले’, राऊतांनी बैठकीनंतर स्पष्टच सांगितलं

ओळखीचा घेतला गैरफायदा

मंगळुरुमध्ये तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र सोमवारी मध्यरात्री त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिच्या मृत्यूदेहाचे शवविच्छेदना करुन अल्पवयीन मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणाच्या छळामुळे तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे वाचलं का?

मुलाकडूनही आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी 24 वर्षीय अन्वरला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अन्वरबरोबरच साहिल नावाच्याही आणखी एका तरुणाला कुंबळा पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या पालकांनी सांगितले की, मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट समजल्यानंतर अन्वरनेही एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असंही मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

वडिलांना ठार मारणार

अन्वरने अल्पवयीन मुलीला वारंवार धमक्या दिल्या होत्या. तिच्या नातेवाईकांच्या लग्नात गोंधळ घालण्याचीही धमकी दिली होती. तर तिच्या वडिलांनाही ठार मारण्याचे त्याने धमकी दिली होती, त्यामुळे आता अन्वर नावाच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Manoj Jarange : 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, रायगडाच्या पायथ्यावरून जरांगेंची गर्जना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT