Crime: सामूहिक बलात्कार, कोळशाच्या भट्टीत फेकलं…अल्पवयीन मुलीसोबत घडली भयंकर घटना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राजस्थानच्या (Rajsthan) भिलवाडा (Bhilwara) जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंचं नाही तर आरोपींनी मुलीच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेने सध्या संपूर्ण राजस्थान हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींसोबत त्यांच्या बायका देखील या घटनेत सामील असल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.(minor girl thrown into coal furnace wives of accused involved bhilwara rajasthan crime story)

ADVERTISEMENT

पोलीस अधीक्षक आदर्श सिंधु यांनी दिलेल्या माहितीनूसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बकरी चरण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी दुपारच्या सुमारास कोळशाच्या भट्टीजवळ तसवारी गावचा 21 वर्षीय कान्हा आणि 25 वर्षीय कालू हे दोन तरूण होते. या दोन्ही तरूणांनी संधी साधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी मुलीच्या डोक्यावर गंभीर वार केला. या हल्ल्यात मुलगी बेशुद्ध झाली होती. मात्र आरोपींना मुलीचा मृत्यू झाल्याचे समजून तिला कोळशाच्या भट्टीत टाकले होते.

हे ही वाचा : Ratnagiri: नीलिमा चव्हाण शेवटची भेटलेली ‘त्या’ जोडप्याला.. नेमकं काय घडलं?

या सर्व प्रकारानंतर रात्री 11 वाजता पुन्हा आरोपी कोळशाच्या भट्टीजवळ आले होते. यावेळी अल्पवयीन मुलीचा शरीराचा अर्धा भाग जळाला होता, तर अर्धा भाग तसाच होता. त्यामुळे आरोपींनी मुलीचे डोकं आणि छातीचा काही भाग घेऊन घटनास्थळावरून 100-200 मीटर दूर तलावात फेकला होता.

हे वाचलं का?

मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोधा शोध सुरू केला होता. यावेळी कुटुबियांना एकेठिकाणी मुलीच्या चपला आढळल्या. त्यानंतर पुढे जाऊन कोळशाच्या भट्टीजवळ मुलीच्या हातातल्या बांगड्या आणि हाडे मिळाली होती. त्यामुळे गँगरेपनंतर मुलीची हत्या करून तिला भट्टीत टाकण्यात आले होते की तिला जिवंत भट्टीत फेकण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींसोबत त्यांच्या बायकांनी देखील मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा देखील पोलीस तपास करत आहेत. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Jalgaon: ‘त्या’ नराधमाला गावात आणताच तुफान राडा, चिडलेल्या गावकऱ्यांनी तर..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT