लव, सेक्स आणि धर्मांतर! मीरा रोडमधील 22 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mira raod love jihad case naya nagar police register case crime news
mira raod love jihad case naya nagar police register case crime news
social share
google news

मीरा रोडमधून (Mira Road) लव जिहादची (love Jihad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरूणीला जबरदस्ती प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे लैंगिक शोषण करून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी तरूणासह त्याचे आई-वडिल, मित्र आणि धर्मगुरुंना नया नगर (Naya Nagar Police) पोलिसांनी अटक करून आयपीसी कलम 376(2 (n), 366, 323, 504, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. (mira raod love jihad case naya nagar police register case crime news)

पीडित तरूणीने नया नगर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरूणीची 2022 साली बोरीवलीत राहणाऱ्या शहबाज नावाच्या तरूणासोबत मैत्री झाली होती. पीडित तरूणी मिरा रोड स्टेशननजीक असलेल्या कम्प्युटर क्लासेसमध्ये शिकायला जायची. त्या क्लासेस बाहेर तिला भेटायला शहबाज नेहमी यायचा. काही दिवसानंतर शाहबाजने पीडित तरूणीची भेट अमीन शेख नावाच्या तरूणाशी करून दिली होती. या भेटीनंतर अमीन शेख पीडित तरूणीला भेटायला जायचा.

हे ही वाचा : क्रूरतेचा कळस! केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, पत्नीने दिव्यांग पतीसोबत…

अनेक दिवसाच्या मैत्रीनंतर अमीन शेख 16 फेब्रुवारी 2022 ला पीडित तरूणीला तिच्या कम्प्युटर क्लासेस बाहेर भेटायला गेला होता. यावेळी अमीनने तिला प्रपोज केले होते. पण पीडितेने त्याला नकार देताच त्याने चाकू बाहेर काढत ”मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि जर तू प्रेमाला होकार दिला नाहीस, तर चाकू मारून आत्महत्या करेन” अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून पीडित तरूणीने आरोपीला होकार दिला होता. या होकारानंतर अमीनने काही दिवसांनी पीडित तरूणीला कोणत्या तरी बहाण्याने आपल्या घरी बोलावत आत्महत्या करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तरूणीचं धर्मांतर केलं

या घटनेनंतर 21 जून 2022 ला अमीन गाडी घेऊन पीडितेच्या घरासमोर आला आणि तिला गाडीत बसवून घेऊन गेला. यावेळी गाडीत अमीन सोबत दोन आणखीण माणसे बसली होती. यामधील एकाने तिला आपल्याला आता मस्जिदला जायचे आहे आणि तुला आता हिंदूतून आता मुस्लिम बनायचे असल्याचे सांगितले. यानंतर पीडित तरूणीला वांद्रेतील एका काझीकडे नेत मुस्लिम धर्माप्रमाणे राहिमा असे तिचे नामकरण करण्यात आले आणि 100 रूपयाच्या एका स्टॅम्प पेपरवर तिची सही घेतली. यानंतर अमीनेने तिला उत्तनच्या हजरत बालेशह सय्यद दरगाह येथे घेऊन जात तिच्या हातावर ताबीज बांधला.

दरम्यान पीडित तरूणीच्या धर्मांतरानंतर दुसऱ्या दिवशी तिला अमीनचे लग्न झाल्याची माहिती मिळाली होती. ज्या मुलीला तो भावाची मुलगी म्हणत होता, तीच त्याची मुलगी निघाली होती. या घटनेनंतर पीडित तरूणीवर अमीन आणि त्यांच्या कुटुंबियांनी अत्याचार करून तिचा छळ केला. तिला घरात कोडूंन देखील ठेवलं जायचयं. पोलिसांना या घटनेची तक्रार मिळताच त्यांनी पीडित तरूणीची सुटका केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : वासनांध प्रदीप कुरुळकरचे कारनामे! कार्यालयातील बाथरूममध्येच महिलांसोबत…

दरम्यान पीडित तरूणीने दिलेल्या जबाबानंतर नयानगर पोलिसांनी प्रेमी अमीन आजम शेख, आई रेशमा आजम शेख, काजी मुफ्तीन इस्माइल, जरियाब सलीम सय्यद आणि एका अज्ञात आरोपीविरोधात आयपीसी कलम 376(2 (n), 366, 323, 504, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक करून तपास सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT