Mira Road Murder : रेशन दुकानात भेट अन् क्रूर शेवट! झोप उडवणाऱ्या हत्येची Inside Story
breaking news today mira-bhayandar : मुंबई उपनगरातील मीरा रोड भागात राहणाऱ्या मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्याने लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवत असे.
ADVERTISEMENT

Who is Manoj sane : मुंबई उपनगरातील मीरा रोड भागात राहणाऱ्या मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्याने लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवत असे. या हृदयद्रावक आणि क्रौर्याच्या सीमा पार करणाऱ्या घटनेने दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलीस तपासात मयत सरस्वती हिची मनोजशी 2014 मध्ये भेट झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आधी सरस्वती अनाथ असल्याचे सांगितले, पण नंतर तिच्या बहिणींबद्दल माहिती मिळाली. (What is Mira Road murder case?)
पोलिसांनी सांगितले की, “पीडिता पूर्वी बोरिवलीच्या पश्चिम उपनगरात एका आश्रमात राहत होती. मनोज साने ज्या रेशन दुकानात काम करायचा तिथे ती अनेकदा जायची. 2014 साली मनोज साने आणि सरस्वतीची याच रेशन दुकानावर भेट झाली. तिथून दोघांमधील जवळीक वाढत गेली. त्यानंतर 2016 पासून दोघे एकत्र राहू लागले. तीन वर्षांपूर्वी ते मीरा रोडवरील फ्लॅटमध्ये राहायला आले होते.
मीरा रोड येथील नयानगर पोलीस अधिकाऱ्यांनी सरस्वती वैद्यच्या कुटुंबाचा शोध घेतला. सरस्वतीला तीन बहिणी असून, सर्व बहिणी नया नगर पोलीस ठाण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सरस्वतीच्या हत्येचा बहिणींना धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
सरस्वतीचा मृतदेह मनोजने घातला कुत्र्यांना
मनोज साने यांच्या फ्लॅटमधून शरीराचे कापलेले आणि उकडलेले अवयव सापडले आहेत. शरीराचे अवयव मिक्सरमध्ये बारीक करून, तर काही भाग प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यात आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखे आहे.