Sameer Wankhede यांचा पाय आणखी खोलात, मनी लाँड्रिंगप्रकरणी आता ED कडून गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

ed cbi
ED fir sameer wankhede
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समीर वानखेडे पुन्हा अडकले

point

IRS अधिकारी समीर वानखेडेंवर थेट ED ची कारवाई

point

समीर वानखेडेंना सगळच भोवणार

Sameer Wankhede : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्या नंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीबीआयनंतर आता मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

ADVERTISEMENT

25 कोटींची लाच आणि आरोप

समीर वानखेडे आणि इतर 2 एनसीबी अधिकाऱ्यांवर एनसीबीकडून केलेल्या दक्षता तपासात कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 25 कोटींची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप केला असून आता त्याप्रकरणी समीर वानखेडे व त्यांच्या बरोबर असलेले 2 अधिकाऱ्यांना आता ईडीकडूनही समन्स बजावण्यात येणार आहे.

कारवाई करू नये

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना समन्स बजावल्यानंतर, आता वानखेडे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात ईडी ईसीआयआर रद्द करण्यासाठी आणि कोणतीही जबरदस्ती कारवाई न करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापूर्वीच सीबीआय खटल्यासाठीगी त्यांनी अर्ज दाखल केले होते. 

हे वाचलं का?

सगळे आरोप फेटाळले

सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची याआधीच चौकशी करण्यात आली आहे. त्याआधीच समीर वानखेडे यांनीही सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावले असून एनसीबी अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा जाहीर आरोपही त्यांनी केला होता. 

एनसीबीच्या विशेष चौकशी

आर्यन खानला 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून अटक झाली होती. कार्डेलिया क्रूझवर धाड टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाकडून 27 मे 2023 रोजी आर्यन खानला या प्रकरणी क्लीन चीटही देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

आर्यन खानचा सहभाग नाही

आर्यन खानला क्लीन चीट देण्यात आल्यानंतर समीर  वानखेडेंनी केलेले आरोप चुकीचे असून आर्यन खानचा अमली पदार्थाच्या विक्री रॅकेटमध्ये त्याचा कोणताही सहभाग नसल्याचा निर्वाळाही नंतर विशेष चौकशी पथकाकडून देण्यात आला होता. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT