तीन दिवसापूर्वीच साजरा केला वाढदिवस,असं काय घडलं की आईने मुलाचा घोटला गळा
राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमधून (Udaipur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका आईनेच (mother) 14 वर्षीय मुलाची (Son) कपडे सुकवण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. पुरजन्य पारीख (वैष्णव) असे या मृत मुलाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
Crime News Marathi : राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमधून (Udaipur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका आईनेच (mother) 14 वर्षीय मुलाची (Son) कपडे सुकवण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. पुरजन्य पारीख (वैष्णव) असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (police) आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.आरोपी आई ही मानसिक रूग्ण होती. यामधून तिने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (mother killed her son to death udaipur rajsthan crime story)
ADVERTISEMENT
मृत मुलाच्या वड़िलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे वडील दीपक पारीख घटनेदरम्यान मॉर्निग वॉकला गेले होते. याच दरम्यान मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीने कपडे सुखवण्याच्या दोरीने मुलाचा गळा आवळुन हत्या केली. दीपक पारीख घरी परतताच दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. त्यानंतर पारीख शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत गेले असता त्यांना धक्काच बसला.
हे ही वाचा : Delhi Builder Wife Murder: जिममध्ये मैत्री, भररस्त्यातच हत्या; मोबाइलमध्ये खुनाचं ‘राज’?
घरात मृत मुलाची आई मनीषा आरामात बसली होती. तर तिच्यापासून थोडे दुर बेडवर मुलाचा मृतदेह पडला होता. त्याच्या गळ्यावर निषाण होते आणि बाजूलाच 2 दोऱ्यांचे तुकडे पडले होते. तीनच दिवसापूर्वी पुरजन्य पारीखचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आता त्याच्या हत्येची घटना घडली आहे. हे दृष्य पाहून पारीख यांना मोठा हादराच बसला.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर अंबामाता पोलिस ठाण्याचे अधिकारी हनवंत सिंह राजपुरोहीत टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेवर 2018 पासून मानसिक उपचार सुरु आहेत. तसेच या प्रकरणावर सध्या मृत मुलाचे कुटुंब काहीही बोलायला तयार नाही आहेत.
हनवंत सिंह या प्रकरणावर म्हणाले की, महिलेची चौकशी केली जात आहे. तसेच गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली जाणार आहे. दुपारपर्यंत पोस्टमार्टम करून मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यत येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime: हॅलो, मी सीबीआय अधिकारी बोलतोय…महिलेची लाखोंची फसवणूक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT