पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आईने दोन मुलांनाच संपवलं! नंतर, सासऱ्यांना सुद्धा... महिलेचं भयंकर कृत्य

मुंबई तक

एका आईने आपल्या पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी पोटच्या दोन मुलांचा खून केला. इतकेच नव्हे तर, मुलांच्या हत्येनंतर आरोपी महिलेने तिच्या सासऱ्यांचा खून करण्याचा सुद्धा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी महिलेचं भयंकर कृत्य
पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी महिलेचं भयंकर कृत्य
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आईने दोन मुलांनाच संपवलं!

point

नंतर, सासऱ्यांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न

point

महिलेचं कुटुंबियांसोबत भयंकर कृत्य

Crime News: गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका आईने आपल्या पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी पोटच्या दोन मुलांचा खून केला. इतकेच नव्हे तर, मुलांच्या हत्येनंतर आरोपी महिलेने तिच्या सासऱ्यांचा खून करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र, कसं बसं बाहेर पडून पीडित सासऱ्यांनी आपला जीव वाचवला. 

पोलिसांनी दिली माहिती 

पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, संबंधित घटना गुरुवारी रात्री नवसारी जिल्ह्याच्या बिलिमोरा कस्बे येथील देसरा परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये झाली. पोलिसांनी हत्याप्रकरणातील आरोपी महिलेला अटक केली असून ती उत्तर प्रदेशची मूळ रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव सुनीता शर्मा असून ती तिच्या पती शिवकांत, त्यांची मुले आणि सासू-सासऱ्यांसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. दरम्यान, शिवकांतला टायफॉइड या मोठा आजार झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी मुलांचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीताचे सासू-सासरे शिवकांतसाठी जेवण घेऊन रुग्णालयात गेले होते आणि तिथून परत घरी आल्यानंतर ते झोपून गेले. त्यावेळी, सुनीता तिच्या बेडरूममध्येच होती. खरं तर, ती बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ होती. त्या दिवशी, अचानक रात्री ती देवाकडे प्रार्थना करू लागली आणि आपल्या पुर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी तिने तिच्या दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांची हत्या केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp