Vivek Bindra : कानाचा पडदा फाटला, पत्नीला मारहाण…मोटिव्हेशनल स्पीकर बनला सैतान!
विवेक बिंद्राने 6 डिसेंबर 2023 रोजी यानिकाशी लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या आठवड्यानंतरच 14 डिसेंबर रोजी विवेक विरुद्ध नोएडा सेक्टर 126 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक बिंद्राचा मेहुणा वैभव क्वात्रा याने ही तक्रार दाखल केली होती
ADVERTISEMENT
Social Media Influencer Vivek Bindra Domestic Violence By Wife Yanika : सोशल मीडियावर सध्या मोटीवेशनल स्पीकर संदीप महेश्वरी (sandeep maheshwari) विरूद्ध विवेक बिद्रा (vivek bindra) यांच्यात वाद सूरू आहे. हा वाद चर्चेत असतानाच आता विवेक बिंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण नोएडा सेक्टर 126 पोलिस स्टेशनमध्ये विवेक बिंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (motivational speaker and social media influencer vivek bindra domestic violence by wife yanika and sandeep maheshwari vs vivek bindra)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्राने 6 डिसेंबर 2023 रोजी यानिकाशी (yanika) लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या आठवड्यानंतरच 14 डिसेंबर रोजी विवेक विरुद्ध नोएडा सेक्टर 126 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक बिंद्राचा मेहुणा वैभव क्वात्रा याने ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत विवेक बिंद्रावर पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा : Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत..’, जरांगेची भुजबळांवर जहरी टीका
मेहुण्याचा आरोप काय?
या प्रकरणात मेहुणा वैभव क्वात्रा म्हणाला की, माझी बहीण यानिका हिचे लग्न विवेक बिंद्रासोबत 6 डिसेंबर 2023 रोजी ललित मानगर हॉटेलमध्ये झाले होते. विवेक बिंद्रा नोएडामधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी सेक्टर 94 मध्ये राहतो. विवेक बिंद्रा 7 डिसेंबरला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईशी वाद घालत होता. यादरम्यान बहीण यानिकाने मध्यस्थी केली असता विवेकने तिला खोलीत बंद करून शिवीगाळ केली. यानंतर तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. यानिकाला कानानेही नीट ऐकू येत नाही. सध्या यानिकाला दिल्लीतील कैलास दीपक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
Motivational speaker Vivek Bindra beats his wife badly, her eardrum bursts.
According to the details mentioned in the FIR, Bindra allegedly took Yanika inside a room, pulled her hair and assaulted her. The complaint claims that Yanika is unable to hear properly because of the… pic.twitter.com/2ohnIRZ7lv
— Dr Honey choudhary (@doctors__squad) December 23, 2023
हे ही वाचा : Sunil Kedar : काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला बँक घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा, प्रकरण काय?
या प्रकरणात पोलिसांनी विवेक बिंद्राविरुद्ध भादंविच्या कलम 323, 504, 427 आणि 325 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT