Pune : दर्शना पवारचा खून करुन बंगालला गेला.. राहुल हांडोरेला मुंबईत कसं पकडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mpsc topper darshana pawar murder rahul handore bengal arrest mumbai inside story pune crime
mpsc topper darshana pawar murder rahul handore bengal arrest mumbai inside story pune crime
social share
google news

Pune Crime Darshana Pawar: पुणे: राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येप्रकरणी (Murder) फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला (Rahul Handore) पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबई येथून अटक करण्यात आली. दर्शनाने लग्नास नकार दिल्याने राहुल हंडोरेने तिचा खून केला आहे. अशी माहिती पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच नराधम आरोपीला पोलिसांनी नेमकी कशी अटक केली याचीच Inside स्टोरी आता समोर आली आहे. (mpsc topper darshana pawar murder rahul handore bengal arrest mumbai inside story pune crime)

ADVERTISEMENT

राहुल हांडोरेच्या अटकेची Inside Story

या संपूर्ण हत्येप्रकरणी पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं की, पुण्यातील एका संस्थेकडून दर्शना पवार हिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याकरिता दर्शना ही 9 जून रोजी पुण्यात आली होती. त्यानंतर ती नऱ्हे येथील एका मैत्रिणीकडे राहत होती. सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर 12 जून रोजी राजगड किल्ल्यावर जात असल्याची माहिती मैत्रिणीला आणि कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर तिचा फोन बंद येत होता. त्यानंतर दर्शनाच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस केली होती.

ही तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी दर्शनाचा तपास सुरू केला होता. ज्यानंतर पोलिसांना 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याशी सीतेचा माळ या ठिकाणी दर्शनाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आसपासच्या भागातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यामध्ये आरोपी राहुल हंडोरे आणि मयत दर्शना हे दोघे 12 जून रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास जाताना दिसून आले. तर पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल हंडोरे हा गडावरून खाली येताना एकटाच येत असल्याचा दिसून आला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Pune : MPSC पास दर्शना पवारला राहुल हंडोरेनेच संपवलं! हत्येचं कारण…

ज्यानंतर आरोपी राहुल हांडोरे याच्या शोधासाठी विविध भागात तपास पोलिसांनी पथक रवाना केली होती. पण आरोपी राहुल हंडोरे याचे मोबाइलचे लोकेशन कलकत्ता सह विविध राज्यात दिसून येत होतं. त्या कालावधीमध्ये आरोपी राहुल हंडोरे हा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्याच दरम्यान मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशन येथे काल अचानक त्याचे लोकेशन आढळून आले. त्याचनुसार आरोपी राहुल हंडोरे याला सापळा रचून अटक करण्यात आले.

यावेळी राहुलने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबाबात असं म्हटलं आहे की, दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

MPSC, लग्न.. अन् दर्शनाची हत्या…

राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते, ही माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात होते.

ADVERTISEMENT

त्यावेळी दोघांचीही ओळख घट्ट झाली. दरम्यान, राहुल हंडोरेच्या मनात दर्शना पवारसोबत लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. दोघेही परीक्षेची तयारी करत असताना दर्शना परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि तिची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवडही झाली.

हे ही वाचा >>  ‘मला त्याचे तुकडे करायचेत’, दर्शना पवारच्या आईचा ह्रदय पिळवटून टाकणारा टाहो!

दुसरीकडे राहुल हंडोरेला परीक्षेत यश मिळत नव्हते. दरम्यान, राहुलने दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नाची इच्छा बोलून दाखवली आणि थोडा वेळ मागितला. पण, तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला. तिच्या कुटुंबीयांनी दर्शनाचे दुसऱ्या मुलाशी लग्नही ठरवले. पण हीच बाब दर्शनाच्या जीवावर बेतली. या एकाच गोष्टीमुळे आरोपी राहुलने दर्शनाचा जीवच घेतला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT