Mumbai Viral Video : दोन मुलींसोबत तरूणाचा बाईकवर जीवघेणा स्टंट, पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai Bike Stunt Video Viral
Mumbai Bike Stunt Video Viral
social share
google news

Mumbai Bike Stunt Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तरूणाने दोन मुलींसोबत बाईकवर (Bike Stunt Video) जीवघेणा स्टंट केला आहे. या स्टंटचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिस (Mumbai Police) अॅक्शन मोडमध्ये आली असून तरूण आणि तरूणींचा शोध सुरु आहे. (mumbai bike stunt video two girl sitting with boys viral video)

ADVERTISEMENT

व्हिडिओत काय?

मुंबईच्या रस्त्यावर एका तरूणाने त्याच्या मैत्रिणीसोबत खतरनाक स्टंट केला आहे. तरूण वेगाने गाडी चालवतो आहे आणि त्याच्या गाडीवर दोन मुली बसल्या आहेत. यामध्ये एक मुलगी ही पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे, तर दुसरी मुलगी ही तरूणाच्या मागे बसली आहे. य़ा अवस्थेत तरूण पुढचा टायर वर करून मागच्या एका टायरवर तुफान वेगाने गाडी चालवत आहे. या घटनेत अपघात होण्याची शक्यता आहे.मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही अपघात झाला नाही. तरूणाच्या या बाईक स्टंटचा व्हिडिओ (Bike Stunt Video) आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : मच्छर मारणाऱ्या कॉईलने घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव, नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओतील (Bike Stunt Video) स्टंटनंतर तरूण अडचणीत सापडला आहे. या तरूणाचा आणि त्याच्यासोबत बाईकवर बसलेल्या तरूणांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून मेट्रोचे कामकाज सूरू असलेल्या ठिकाणी हा व्हिडिओ शुट करण्यात आल्याचे समजते आहे. पोलिस या प्रकणाचा तपास करत आहे.

हे वाचलं का?

पोथोल वॉरियर्स फाऊंडेशनने बाईकवरील (Bike Stunt Video) स्टंटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना हा व्हिडिओ टॅग करत संबंधिताच्या बाईकचा नंबर पाहून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून तरूणावर टीका केली आहे.

हे ही वाचा : क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

दरम्यान हा व्हिडिओ झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या तीनही व्यक्तींचा शोध सूरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तसेच याआधी आणखीण एक व्हिडिओ व्हायरला झाला होता. या व्हिडिओमध्ये एक माणूस दुचाकी चालवताना सिगारेट फुंकत होता. विशेष म्हणजे गाडी चालकाच्या बायकोने हातात सिगारेट पकडली होती. आणि ती गाडी चालकाच्या सिगारेट तोंडावर जवळ नेऊन त्याला ओढायला मदत करत होती. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT