Mumbai Crime : टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोन गणेशभक्तांना उडवलं, मुलुंड Hit And Run ची Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai mulund hit and run story accuse arrested from kharghar inside story of hit and run case
मुलुंड हिट अँड रनची Inside Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलुंड हिट अँड रनची इनसाईट स्टोरी

point

आरोपीला अटक करण्यासाठी 8 तैनात

point

आरोपी कसा सापडला?

Mumbai Mulund Hit and Run : एजाज खान, मुंबई :  मुंबईच्या मुलुंड भागात शनिवारी हिट अँड रनची घटना घडली होती. या घटनेत एका बीएमडबल्यू कार (BMW Car) चालकाने दोन गणेशभक्तांना धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला होता. आता या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शक्ती हरविंदर अलग असे या आरोपीचे नाव आहे. शक्ती हा टेस्ट ड्राईव्ह घेत असताना हा अपघात घडल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघाताची इनसाईड स्टोरी जाणून घेऊयात.( mumbai mulund hit and run story accuse arrested from kharghar inside story of hit and run case) 

खरं तर पहाटेचे 4 वाजते होते. सगळेच गणेश चतुर्थीत मग्न होते. कुणी घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करत होते. तर कुणी मंडळाची बँनरबाजी करण्यात लागलं होतं. अशात मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे दोन मंडळाचे कार्यकर्ते मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. या दरम्यान अचानक भरधाव वेगाने एक बीएमडब्लू कार आली. ती कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना तिने या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना धडक दिली होती. या धडकेनंतर आरोपी शक्ती हा फरार झाला होता. 

हे ही वाचा : Maharashtra Assembly Election Survey : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? मविआची झोप उडवणारा सर्व्हे

शक्तीने खरं तर त्याची गाडी दुरूस्ती केली होती. त्यामुळे ती व्यवस्थित काम करते की नाही हे पाहण्यासाठी त्याने परिसरात फिरवून बघत असताना त्याने  प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील यांना धडक दिली. या अपघातानंतर त्याने दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर थेट पळ काढला होता.या घटनेनंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला होता, तर प्रसाद पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली होती. सध्या त्याच्यावर उपचार सूरू आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थीच्या दिवशीच ही घटना घडल्याने नागरीकांमध्ये रोष होता. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ हालचाली करत शोध सुरु केला होता. यामध्ये बीएमडबल्यू कारचा शोध लागला होता. मात्र आरोपी त्यांना सापडू शकला नव्हता. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 टीम तैनात केल्या होत्या. अखेर या प्रकरणात पोलिसांना यश आले आणि त्यांनी शक्तीला खारघरमधून अटक केली आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 1500 हातातून गमावून बसाल', 'ही' चूक अजिबात करू नका

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शक्ती हरविंदर अलग हा मुलुंडचाच रहिवासी असून कॉल सेंटरला कामाला आहे. शक्ती हरविंदर अलग याच्याच बीएमडबल्यू कारने प्रसाद आणि प्रितमला धडक दिली. या अपघातानंतर गाडी घराजवळ लावून बाइकने त्याने नवी मुंबई गाठली होती.. मात्र तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी खारघर येथून त्याला अटक केली आहे.या प्रकरणी आरोपी शक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT