Crime: मुंबईतील पोलिसाने चक्क केली तरुणाची हत्या, कारण…
मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममधील एका पोलिसाने दोघांवर गोळी झाडल्याने त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास करताना एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime: मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) (Quick Response Team) मधील एकाने दोघांवर केलेल्या गोळीबारात (firing) एकाचा उपचारादरम्याने मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले की, अजिज अस्लम सय्यद ( वय 30) (Aziz Aslam Syed) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की, 13 ऑक्टोबरच्या रात्री विरारमधील (Virar) सय्यद हा त्याचा चुलत भाऊ फिरोज शेख (वय 27) याच्यासोबत दुचाकीवरून उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव शहराकडे जात होता.
ADVERTISEMENT
कर्जामुळे गोळीबार
ठाणे जिल्ह्यातील मेंढे गावाजवळ एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्या दुर्घटनेत ते जखमी झाले होते. त्या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमचे सदस्य सूरज देवराम ढोकरे (वय 37) याने गोळीबार केला होता. त्याच्यावर 62 लाखाचे कर्ज असल्यामुळेच त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना तो लुटण्याचा प्रयत्न करत होता.
हे ही वाचा >> Crime: पतीची हत्या अन् नंतर बनवला कढी-भात.. बँक मॅनेजरच्या विकृत पत्नीचं भयंकर कृत्य!
शिर्डीमधून घेतलं ताब्यात
या घटनेनंतर सूरज ढोकरेला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वेय त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.
हे वाचलं का?
बळी सामान्य माणसाचा
सूरज ढोकरेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक देशमाने यांनी सांगितले की, सय्यदचा 16 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसाने चालवलेल्या गोळीबारात एका सामान्य माणसाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा >> Nilesh Rane Retirement : फडणवीसांची भेट अन् नीलेश राणेंचा निर्णय मागे; कारण…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT