Mumbai Crime : ड्रायव्हरला कानशिलात लगावली, उचलून जमिनीवर आपटलं; घाटकोपर घटनेचा थरारक Video समोर
Mumbai Road Rage Video : घाटकोपरमध्ये एका व्यक्तीने ओला ड्रायव्हरला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत नुसती ड्रायव्हरला मारहाण झाली नाही आहे तर त्याला उचलून रस्त्यावर आपटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या ओला ड्रायव्हरच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ओला चालकाची ऑडीला मागून धडक
ऑडी चालकाने ओला ड्रायव्हरला कानशिलात लगावली
घाटकोपर घटनेचा व्हिडिओ आलो समोर
Mumbai Road Rage Video : घाटकोपरमध्ये एका व्यक्तीने ओला ड्रायव्हरला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत नुसती ड्रायव्हरला मारहाण झाली नाही आहे तर त्याला उचलून रस्त्यावर आपटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या ओला ड्रायव्हरच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी आता ऑडी चालक आणि त्याच्या पत्नी विरोधात पार्कसाईट पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सूरू आहे. (mumbai road rage video man slaps ola driver and smashes him to ground video viral mumbai crime)
व्हिडिओत काय?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका मागून एक दोन चारचाकी गाड्या येतातय. यामध्ये ऑडी कार पुढे आहे, तर त्याच्यामागून ओला कार येते आहे. या दरम्यान ऑडी कारचालक काही कारणास्तव गाडी थांबवतो. आणि मागच्या कार चालकाचा काही गाडीवर कंट्रोल राहत नाही आणि तो थेट ऑडीला मागून धडक देतो.
या घटनेनंतर संतापलेला ऑडी चालक आणि त्याची बायको कारबाहेर येते. त्यानंतर ऑडी चालक थेट ओला चालकाच्या कानशिलात लगावतो. आणि त्यानंतर त्याच्यावर बुक्क्यांचा मारा करून त्याला थेट उचलून जमिनीवर आपटून देतो. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 19 ऑगस्ट 2024 च्या रात्री ही घटना घडली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Santosh Banger: ''तुम्ही हुशाऱ्या झ#@X...', शिंदेंचे आमदार संतोष बांगरांची अधिकाऱ्याला शिवीगाळ
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35 (3) अंतर्गत ऑडी चालक आणि त्याच्या पत्नीला नोटिसा पाठवल्या आहेत, ज्याने अलीकडेच फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) बदलली आहे.
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनूसार, ओला चालक कुरेशी घाटकोपर (प.) च्या असल्फा भागात गाडी चालवत असताना ऑडी चालक चक्रवर्तीने त्यांना धडक दिली होती. या धडकेनंतर दोघांमध्ये वाद झाला. या दरम्यान चक्रवर्ती सोबतच्या एका महिलेने ओला टॅक्सीचे नेव्हिगेशन डिव्हाइस हिसकावले आणि कुटुंबाने तेथून पळ काढला. त्यामुळे कुरेशी यांनी मागून ऑडीचा पाठलाग केला होता.
ADVERTISEMENT
हा पाठलाग सूरू असताना चक्रवर्ती द ॲड्रेस हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये घुसतात. या दरम्यान ऑडीला ओला कारची थोडीशी धडक बसते. या धडकेनंतर संतापून बाहेर उतरून चक्रवर्ती सुरूवातीला कुरेशीला कानशिलात लगावतात. त्यानंतर त्याला कारमागे मारत मारत नेत उचलून जमिनीवर आपटून देतो. ही संपूर्ण सोसायटीच्या आवारात लावलेल्या कॅमेरात कैद होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत संपतेय का...काय आहे शेवटची तारीख?
या सर्व घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी कुरेशी यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. पण त्याच्या डोक्याला झालेली जखम पाहून त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी बुधवारी एफआयआर दाखल केला होता. ही घटना पाहून नागरीकांना चीड येतेय.
ADVERTISEMENT