'CM अभिनेत्यांसोबत Busy तर, गृहमंत्री गलिच्छ राजकारणात...', बलात्काराच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंनी सुनावलं

योगेश पांडे

नागपूरमधील 9 वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या घटनेने शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमधील 9 वर्षाच्या मुलीवर लहान बहिणीसोबत बलात्कार

point

आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका

point

गृहमंत्री फडणवीसांवर देखील साधला निशाणा

Aaditya Thackeray: मुंबई: नागपूरमध्ये एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच 5 वर्षीय बहिणीसमोर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. ही घटना उजेडात येताच आता प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान आणि अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. (nagpur 9 year old girl rape case cm busy with actors and home minister in dirty politics aaditya thackeray direct attack on shinde fadnavis govt)

आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर जहरी टीका

नागपुरातील बलात्काराच्या या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी X वर ही घटना पोस्ट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा>> Nagpur Crime: लहान बहिणीसमोर 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 20 रुपये दिले अन्...

'महाराष्ट्रासाठी, बेकायदेशीर आणि बेशरम मुख्यमंत्री, गद्दार मिंधे, हे प्रशासनाबाबत प्रचंड अनभिज्ञ आहेत. ते त्यांच्या फोटो ऑप्ससाठी अभिनेत्यांना आमंत्रित करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी राज्य अराजकतेत बुडण्यासाठी सोडून दिलं आहे. कायद्याची कोणालाही भीती राहिलेली नाही. तर गृहमंत्री हे गलिच्छ राजकारणात व्यस्त आहे.' असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच नागपूरमधील या घटनेन देखील पुन्हा एकदा चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp