Crime : नांदेडमध्ये ‘सैराट’, आई-बापाने पोटच्या लेकीचा गळाच चिरला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

nanded crime news honor killing news parents killed daughter himayatnagar news
nanded crime news honor killing news parents killed daughter himayatnagar news
social share
google news

Nanded Crime News : कुवरचंद मंडले, नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या आई-वडिलांनी तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येमागे ऑनर किलिंगचे कारण समोर येत आहेत. या घटनेने सध्या नांदेडमध्ये खळबळ माजली आहे. (nanded crime news honor killing news parents killed daughter himayatnagar news)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या हिमायतनगर येथे ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. या घटनेतील मृत मुलगी हीचे एका परजातीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातूनच ती मुलासोबत पळून गेली होती. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची समजूत काढत तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. मात्र तरी देखील तिच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही आणि तिने मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे मुलीचे कुटुंबिय तिच्या या वागण्याला वैतागले होते. यातूनच मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला’, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

गुरूवारी रात्री मुलगी घरी झोपली असताना तिच्या आई-वडिलांनी विळ्याने तिचा गळा चिरला त्यानंतर तिच्या शरीरावर इतर ठिकाणीही विळ्याने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या हत्येनंतर आई-वडिलांनी तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांना तिच्या आई-वडिलांनी मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. मात्र मुलीच्या शरीरावरील जखमा पाहता डॉक्टरांना हत्येचा संशय आला होता, त्यामुळे त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणात आता मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या आई-वडीलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आई-वडिलांची चौकशी केली असता लग्नाच्या हट्टापायी आणि समाजातील बदनामीच्या भितीने त्यांनी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे. या घटनेने सध्या नांदेड हादरलं आहे.

हे ही वाचा : Ganpat Gaikwad: BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT