Hemant Patil : शिंदेंच्या खासदाराला स्टंटबाजी भोवली! पोलिसांनी दाखल केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा
नांदेड रुग्णालयामध्ये चोवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात जोरदार खळबळ उडाली. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांना स्वच्छतागृह स्वच्छ करण्यास सांगितले. त्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर आता अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Nanded Hospital: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dr. Shankarao Chavan Government Medical College) व रुग्णालयामध्ये चोवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू (24 patients died) झाला होता. त्यानंतर नांदेडच्याच नाही तर राज्यातील शासकीय रुग्णालयातील प्रश्न ऐरणीवर आला. ठाणे, नांदेड आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्येही रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे (Dean Dr. S. R. Wakode) यांनाच स्वच्छतागृह (Toilet) साफ करायला सांगितले.
ADVERTISEMENT
ॲट्रोसिटी गुन्हा दाखल
स्वच्छतागृह डीन यांना स्वच्छता करायला सांगितल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या प्रकरामुळेच डॉ. एस. आर. वाकोडे यांनी आता खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करत असतानाच त्यांच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचाही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> अजित पवार गटाच्या भूमिकेनं भाजपचं वाढणार टेन्शन! शिंदे सरकार काय करणार?
खासदारांसह इतरांवरही गुन्हा
शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर नांदेड रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याबरोबरच आलेल्या 10 ते 15 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वच्छतागृह स्वच्छ करण्यास भाग पाडल्यानंतर हेमंत पाटील यांना हे प्रकरण आता भोवणार असल्याचे दिसत आहे.
हे वाचलं का?
डॉक्टर पेशाचा अपमान
रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास लावल्याने आता सेंट्रल मार्डसारखी संस्थाही आक्रमक झाली आहे. त्यांच्या वर्तणुकीबद्दल डॉक्टर पेशाचा अपमान झाला असल्याचे सांगत खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागावी अन्यथा सर्व डॉक्टर महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांना हे प्रकरण अंगलट आले आहे. यावेळी मार्डने म्हटले आहे राज्यातील आरोग्य व्यवस्था जर कोलमडली गेली तर त्याला सरकारच जबाबदार राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
हे ही वाचा >> Ajit Pawar : अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी? देवगिरीवरील बैठकीत काय घडलं, तटकरे स्पष्टच बोलले…
विरोधकांचा आवाज
खासदार हेमंत पाटील यांनी डॉ. वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ करण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या अनास्थेपोटी मी हे केले असल्याचे सांगितले.
नांदेड रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांनी हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचे सांगितले आहे. हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे विरोधकांनीही त्याविरोधात आता आवाज उठवला आहे. त्यामुळे हे प्रकरण हेमंत पाटील यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT