Exclusive : ‘नग्न धिंड, बलात्कार अन्…’, माजी सैनिकाने सांगितली ‘त्या’ व्हिडिओची हादरवून टाकणारी गोष्ट
मणिपूरमध्ये (manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. इंडिया टूडेने आता या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीची मुलाखत घेतली आहे. पीडित महिलेची पती हे माजी सैनिक आहेत. त्यांनी या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे.
ADVERTISEMENT
manipur Gangrape case : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची भीषणता समोर आली होती. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारल्यानंतर कारवाईला वेग आला होता. आता या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. इंडिया टूडेने आता या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीची मुलाखत घेतली आहे. पीडित महिलेची पती हे माजी सैनिक आहेत. त्यांनी या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे.(necked pared and rape ex-soldier told the shocking story of manipur viral video)
मणिपूरच्या चुरचंदपूर जिल्ह्यात 3 मे रोजी गावात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आम्ही पोलिसांकडे धाव घेतली पण त्यांनी काहीच मदत केली नाही, अशी धक्कादायक माहिती माजी सैनिकाने दिली. दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी हजारोंच्या संख्येने शस्त्रास्त्र घेऊन जमाव आमच्या गावात घुसला. या जमावाने आमचे संपूर्ण गाव पेटून दिले होते. त्यामुळे आम्ही तीन कुटुंब मिळून नजीकच्या जंगलात लपलो होतो,असे माजी सैनिकाने सांगितले.
हे ही वाचा : Manipur: महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी ‘इतक्या’ जणांना अटक, कोण आहेत आरोपी?
माजी सैनिक पुढे सांगतात, जमावाने गाव लुटल्यानंतर आम्हाला शोधून काढले आणि तिघांच्या कुटुंबाला घेऊन गेले. जमावाने गावातील एक महिला, माझी पत्नी आणि एका तरुणीला जमावासोबत घेतले. आरोपींनी त्यानंतर माझी बायको आणि तरूणीला सर्वांसमोर कपडे काढायला लावले. आणि नग्न करून त्यांची धिंड काढली. यावेळी पीडितांपैकी एकीच्या वडील आणि भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोघांची हत्या करून टाकली. मी देखील माझ्या पत्नीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे माजी सैनिकाने सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या घटनेनंतर आम्ही स्वत:चे प्राण वाचवत जंगलात गेलो. यावेळी तक्रार करायला गेलो तर प्राण वाचणार नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन 18 तारखेला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही,असा आरोप माजी सैनिकाने केला आहे. तसेच दोन देशातील लढाई पाहिली, पण मी अशा घटना कधीच पाहिली नाही. अशी घटना होईल याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे मला दु:ख वाटते, असे देखील माजी सैनिक यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
मी कारगिलमध्ये देशासाठी लढलो आणि श्रीलंकेलाही गेलो. मी माझा देश वाचवला पण माझ्या कुटुंबाला मी वाचवू शकलो नाही, माझ्या बायकोलाही मी वाचवू शकलो नाही, याची मला लाज वाटते,अशी खंत माजी सैनिकाने व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Video :झिंज्या उपटल्या, लाथा-बुक्यांनी मारलं, महिला पायलटला जमावाने मारहाण का केली?
माझ्या बायकोवर, गावातल्या महिलेवर बलात्कार केला. तिच्या बापाला आणि मुलालाही जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. आम्हीही माणसे आहोत, आम्हाला जनावरांसारख पळवून मारलं. असे आम्ही कसे जगणार.आता आम्हाला न्याय देण्यासाठी भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी माजी सैनिकाने केली आहे.
ADVERTISEMENT