रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढतानाच गाठले मृत्यूने, तरुणीचा गेला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

new delhi railway station electric current in pole amid rain death of women
new delhi railway station electric current in pole amid rain death of women
social share
google news

पावसाळ्यात शॉक लागून मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वाढते. सार्वजनिक ठिकाणी अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात. अशीच एक घटना आता दिल्लीतून समोर आली आहे. नवी दिल्लीच्य़ा रेल्वे स्टेशन परीसरातील इलेक्ट्रीक खांबाला शॉक लागून महिलेचा मृ्त्यू झाल्याची दूदैवी घटना घडलीय. साक्षी अहूजा असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर मृताची बहीण माधवी हिने रेल्वेच्या निष्काळजीपणाचा आरोप करत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीच्या आधारावर भादंवि कलम 287/304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (new delhi railway station electric current in pole amid rain death of women)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या प्रित विहार परीसरात राहणारी साक्षी आहूजा पहाटे 5 वाजताच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचली होती. साक्षीसोबत आणखीन दोन महिला आणि 3 लहान मुले होते.ही सर्व मंडळी भोपाल शताब्दी ट्रेनने जाणार होती.त्यात दिल्लीतील दमदार पावसामुळे परीसरात गुढघाभऱ पाणी भरले होते. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढून स्टेशन परीसरात पोहोचावे लागत होते. यावेळी साक्षीने गुढघाभऱ पाण्यातून मार्ग काढताना रस्त्यावरील इलेक्ट्रीक खांबाला हात लावला होता. या खाब्यातून शॉक लागल्याने साक्षी अचानक जमीनीवर कोसळली होती. यावेळी स्थानिकांनी तिला खांब्यापासून दूर लोटत रूग्णालयात दाखल केले होते.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

हे ही वाचा : लग्न घरी रक्ताचा सडा! नवरदेव-नवरीच्या गळ्यावर फिरवला चाकू, 5 जणांना झोपेतच संपवलं

दिल्ली रेल्वे स्टेशन परीसरात पावसामुळे पाणी भरले होते. त्यामुळे रस्त्यावरील विजेचे खांब देखील अर्धे पाण्याखाली बुडाले होते. यावेळी साक्षीने चालत असताना विजेच्या खांब्याचा सहारा घेतला. यामध्ये तिला करंट लागून ती खाली कोसळली होती, अशी माहिती काही नागरीकांनी दिली होती. विजेच्या खांब्याच्या आजूबाजूला काही विजेच्या तारी उघड्या होत्या. यामुळे खांब्याला करंट लागत होता. याचवेळी साक्षीने ज्यावेळेस विजेच्या खांब्याला हात लावला, त्यावेळी शॉक लागून तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता रेल्वेसोबत पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. तसेच या घटनेत नेमक्या कोणाच्या निष्काळजीपणामुळे साक्षीचा जीव गेला आहे, याचा शोध घेतला जात आहे.

हे वाचलं का?

पावसाचे पाणी परीसरात साचले होते, त्यात विजेच्या खांबात शॉक आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच रेल्वेच्या कार्यप्रणालीत कोणतीही कमतरता नाही. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी तपास सूरू आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून दिल्ली विभागात विद्युत सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर रेल्वेचे (CPRO)दीपक कुमार यांनी दिली आहे.

या प्रकरणी आता मृताची बहीण माधवी हिने निष्काळजीपणाचा आरोप करत फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारे भादंवि कलम 287/304-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Kolhapur : बलात्कार प्रकरण अन् पत्नी, मुलाला पाजले विष; स्वतःचा चिरला गळा!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT