लग्न समारंभात सुपरडॉनचा गेम, अमीरच्या हत्येची INSIDE Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

tipu balaz trakanwala
tipu balaz trakanwala
social share
google news

Don Amir Tipu Balaz Trakanwala Murder: पाकिस्तानमध्ये (Pakistan) निवडणुकीतील धांदल आणि सरकार स्थापनेबाबतच्या जोरदार चर्चा सुरु असतानाही रविवारी रात्री मात्र एका दुसऱ्याच बातमीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ती बातमी होती लाहोरचा सर्वात मोठा डॉन अमीर बलाज टिपूची हत्येची. त्याची एका लग्नात हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकेकाळी लाहोरचा (Lahore) किंग म्हणून ओळखला जाणारा बिल्लाचा नातू आणि त्या घराण्यातील चौथा वारस असणाऱ्या अमीर याचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मात्र लाहोरच्या अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

मित्राच्या बहिणीच्या लग्नातच हत्या

लाहोरमध्ये रविवारी रात्री 9 वाजता एक महत्त्वाचा विवाहसमारंभ सुरु होता. लाहोरचा सर्वात मोठा आणि सुंदर असलेला डॉन अमीर बलाज टिपूचा सर्वात जवळचा मित्र हमजाच्या बहिणीचा विवाहसमारंभ सुरु होता. यावेळी विवाहसमारंभानंतर मिरवणूकही पार पडली होती. सर्वजण जेवण करून गप्पटप्पा करत बसले होते. यावेळी त्यांच्या स्वतःच बॉडीगार्डही त्यांच्यासोबत तैनात होते. मात्र त्या गर्दीतून एक व्यक्ती सेल्फी घेऊया म्हणत त्याने फोटो काढण्याची विनंती केली. 

भर लग्नात गोळीबार

सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कपड्यात लपवून ठेवलेले हत्यार काढून त्याने सरळ अमीरवर हल्ला केला. त्याच लग्नात हल्लेखोराबरोबर आणखी एक साथीदार त्याच्यासोबत उपस्थित होता, त्यानेही फायरिंग चालू केले. त्यानंतर अमीरच्या बॉडीगार्डनेही त्यांच्या फायरिंगनंतर बॉडीगार्डनेही फायरिंग केले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Tania Singh : प्रसिद्ध मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणात क्रिकेटरची होणार चौकशी

सेल्फी घेताना गोळ्या झाडल्या

अमीरवर हल्ला करणारा आणि त्याचा एक मित्रही पाहुण्यांच्या वेशात तिथेच उपस्थित होता. त्यानेही गोळीबार चालू केला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकाने लगेच सेल्फी घेणाऱ्यावर फायरिंग केले. त्यामुळे त्याचाही जागीच मृत्यू झाला. तर त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. गोळीबार झाल्यानंतर अमीरला तात्काळ लाहोरच्या जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

 मुझे जिंदा रख

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तवाहिनीवर फक्त निवडणुकीचं चित्र दिसत होते. मात्र  18 फेब्रुवारीच्या रात्री अमीरवर झालेल्या गोळीबारमुळे निवडणुकीचं विश्लेषण मागं पडले आणि अमीरच्या बातम्यांचा भडिमार सुरु झाला. अमीरवर झालेल्या गोळीबारामुळे आता प्रत्येक वाहिनीवर फक्त आमीरच्याच ब्रेकिंग न्यूज चालू झाल्या होत्या. त्यामुळे असाही सवाल उपस्थित केला जातो की, अमीर टिपूच्या मृत्यूची बातमी ब्रेकिंग न्यूज का बनली. तर या दरम्यान त्यानेच मृत्यूपूर्वी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर या काही ओळी ठेवल्या होत्या, त्या ओळी होत्या,'ऐ खुदा जब तक जिंदगी मेरे लिए बेहतर है, मुझे जिंदा रख और जब मौत मेरे लिए बेहतर हो तो मुझे उठा ले.'

ADVERTISEMENT

मुंबईच्या वर्चस्ववादाचं चित्र 
 

पाकिस्तानचे नाव समोर आलं की, पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या दहशतवाद्यांचे चेहरे समोर येतात.  याच दहशतवादी संघटनांनी भारतातही रक्तपात घडवून आणले होते. पाकिस्तानामधील अंडरवर्ल्डही मुंबईसारखेच आहे, ज्या प्रकारे मुंबईत वर्चस्ववादासाठी भररस्त्यावर रक्तपात घडवला जातो त्यापेक्षा भयानक चित्र पाकिस्तानात दिसून येतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>अंगावर किलोभर सोनं मिरवणाऱ्या पंढरीशेठ फडकेचं निधन

    follow whatsapp

    ADVERTISEMENT