Tania Singh Suicide : प्रसिद्ध मॉडेलची वयाच्या 28 व्या वर्षी आत्महत्या, स्टार क्रिकेटर अडकला चौकशीच्या फेऱ्यात

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहने 19 फेब्रुवारीला आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती.
model tania singh suicide case sunrises hyderabad player abishek sharma enquiry surat news
social share
google news

Model Tania Singh Suicide case, Abhishek Sharma : आयपीएल 2024 ला सुरूवात व्हायला अवघे काही महिने उरले आहेत. मात्र तत्पुर्वीच आयपीएल चर्चेत आली आहे. यामागचं कारण ठरलाय, तो म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा. कारण अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) वादात सापडला आहे. एका प्रसिद्ध मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्माला पोलीसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे आता अभिषेकची चौकशी होणार आहे. पण या प्रकरणात त्याचं नाव कसं आलं? नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.  (model tania singh suicide case sunrises hyderabad player abishek sharma enquiry surat news) 

सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहने 19 फेब्रुवारीला आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तानियाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सूरू केला आहे. या तपासात पोलिसांनी आत्महत्या प्रकरणाचा सर्वच अँगलेने तपास सुरू केला आहे.या तपासात पोलिसांना तानियाच्या कॉल डिटेल्समध्ये मोठा पुरावा हाती लागला. या कॉल डिटेल्समध्ये क्रिकेटर अभिषेक शर्माचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता त्याची चौकशी होणार आहे. 

हे ही वाचा :  शिंदे सरकारला अडचणीत आणणार, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?

दरम्यान पोलीस तपासात तानिया सिंहच्या आत्महत्येपूर्वी अभिषेक शर्माने तिला कॉल केल्याचे समोर आले आहे. कॉल डिटेल्समध्ये देखील अभिषेक शर्माचे नाव दिसून आले आहे. तानिया सिंह आणि अभिषेक शर्मा गेल्या अनेक महिन्यापांसून एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पण त्यांच्यात शेवटचे संभाषण आत्महत्येपूर्वी झाले होते. त्यामुळे नेमकं दोघांमध्ये काय चर्चा झाली होती? याचा तपास आता पोलीस करीत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तानिया सिंह गेल्या दीड ते दोन वर्षापासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचा अभ्यास करत होती. ती कोणत्या तरी गोष्टीवर तणावात होती, अशी देखील माहिती समोर आली आहे. याचाही तपास आता पोलिस करत आहे. 

हे ही वाचा : Pandhari Sheth Phadke : बैलगाडा प्रेमी पंढरी शेठ फडकेंचं निधन

दरम्यान आता मॉडेल तानिया सिंहच्या आत्महत्या प्रकरणात सुरतच्या वेलू पोलिसांनी अभिषेक शर्माला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आता या चौकशीत अभिषेक शर्माने तानिया सिंहला आत्महत्येपूर्वी का कॉल केला होता? या कॉलमध्ये दोघांमध्ये काय संभाषण झालं होतं? तसेच तानियाच्या आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्माचा हात आहे का? या सर्व गोष्टीचा तपास आता पोलीस करत आहेत. त्यामुळे आता या चौकशीतून काय माहिती समोर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT