Panvel Crime : 10 लाखाची सुपारी देऊन आईच्याच हत्येचा रचला कट, लाडकी मुलगीच जिवावर का उठली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

panvel crime news married daughter with two men murder mother shocking crime story
जन्मदात्या आईचाच हत्येचा कट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मानलेला भावाला आईच्या हत्येची दिली सुुपारी

point

10 लाखात आईच्या हत्येची केली डील

point

तीन आरोपींना अटक

Panvel Crime News : निलेश पाटील, पनवेल :  पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीनेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रिया नाईक (44 ) असे या मृत आईचे नाव आहे.घरगुती वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.यामध्ये प्रणिता पाटील या विवाहीत मुलीचे नाव समोर आले आहे. या घटनेने पनवेल हादरलं आहे. 
(panvel crime news married daughter with two men murder mother shocking crime story) 

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार मुलगी प्रणिता ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पण पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. या कालावधीत तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते; मात्र काही कारणास्तव ते प्रेमसंबंध तुटले होते. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणितावर बाहेर ये-जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज! 'त्या' महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार पैसे

आईच्या या निर्बंधांना प्रणिता वैतागली होती. त्यामुळे निर्बंधातून सूटका करून घेण्यासाठी तिने आईच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी तिने तिच्या मानलेला भाऊ असलेल्या विवेक पाटीलला हत्येची सूपारी दिली. या बदल्यात त्याला 10 लाख देण्याची तयारी दर्शवली. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. मित्र निशांत पांडे याच्या मदतीने विवेकने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली.

हे वाचलं का?

रात्री प्रिया यांचे पती हे घरी आले असता प्रिया बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तातडीने प्रिया यांना रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तपासात विवेक आणि निशांत यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणिताने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली. या घटनेने आता पनवेल हादरलं आहे. 

हे ही वाचा : Eknath Shinde : विधानसभेआधी महामंडळांचं वाटप! शिंदेंच्या 3 नेत्यांना मंत्रीपदाचा दर्जा, पवारांचा एकही नेता नाही?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT