‘आमदार संतोष बांगरांनीच माझी सुपारी दिली’, पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणात स्फोटक दावा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pappu Chavan shooting case bjp yuva district president serious allegations against mla santosh bangar
pappu Chavan shooting case bjp yuva district president serious allegations against mla santosh bangar
social share
google news

हिंगोलीचे (Hingoli) भाजप जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी गोळीबार करून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पीडित पप्पू चव्हाण (Pappu chavan) यांनी पोलिसांनी जबाबच नोंदवून न घेतल्याचा आरोप केला आहे. यासोबत या प्रकरणात आता आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचे तापले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.(pappu Chavan shooting case bjp yuva district president serious allegations against mla santosh bangar)

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने काही दिवसांपूर्वी एका मुलीची छेड काढली होती. या प्रकरणात पप्पू चव्हाण यांनी आरोपीला तंबी देऊन सोडून दिले होते. याचाच राग मनात धरून आरोपीने साथीदारांसह जिल्हा परिषदेच्या आवारात पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्याच्या काही तासातच पोलिसांनी पाच आरोपींपैकी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मुख्य आरोपी अक्षय इंदोरीया आणि त्याचा एक साथीदार सध्या फरार आहेत, अशी माहिती पोलिसांना दिली.

हे ही वाचा :नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, ‘ते’ प्रकरण काय?

पप्पू चव्हाणचे गंभीर आरोप

पोलिसांनी या प्रकणात कारवाई केल्यानंतर आता पप्पू चव्हाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनीच मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. मात्र माझं नशीब चागलं असल्याने मी या हल्ल्यातून बचावल्याचा आरोप पप्पू चव्हाण यांनी केला आहे. यासोबत पप्पू चव्हाण यांनी पोलिसांवर देखील आरोप केला आहे, पोलिसांनी माझा जबाब न घेताच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे माझ्यावर अन्यात झाला असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलीस काय म्हणाले?

पप्पू चव्हाण यांनी केलेल्या या आरोपावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले की, आमचे अधिकारी आम्ही जबाब घेण्यासाठी पाठवले होते. मात्र पप्पू चव्हाण वारंवार त्याचा जबाब बदलत होते, असे पोलिसांनी सांगितले. आम्हाला आरोपीचा मोबाईल, सीसीटीव्ही फुटेजसह काही ठोस पुरावे सापडले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच या हल्ल्यातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.मात्र मुख्य आरोपी अक्षय इंदोरीया आणि त्याचा एक साथीदार सध्या फरार आहेत.तसेच आम्ही पप्पू चव्हाण यांचा पुन्हा जबाब नोंदवून घेऊ आणि त्यांच्या आरोपांची चौकशी करून कारवाई करू असे पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : RPF Constable : “मला कसाबच आठवला”, प्रत्यक्षदर्शीचा थरकाप उडवणारा अनुभव

दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. आता या प्रकरणाता पप्पू चव्हाण यांनी संतोष बांगर यांच्यावर केलेले आरोप खरे ठरतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT