Pune Crime: पिंपरीच्या लॉजवर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड भेटले, नंतर रक्ताच्या थारोळ्यात...नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pimpari chinchwad crime news boy friend attack girlfriend and commit suicide shocking crime story
पिंपरी चिंडवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धारदार शस्त्राने प्रेयसीची हत्या

point

मग बॉयफ्रेेंडने गळफास लावून संपवल जीवन

point

लॉजचा दरवाजा उघडताच पोलिसांना बसला धक्का

Pimpari Crime News : पिंपरी चिंडवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बॉयफ्रेंडने प्रेयसीला लॉजवर नेऊन तिचा खून केल्याची घटना घडली आहे. बॉयफ्रेंड इतक्यावरच थांबला नाही तर त्याने लॉजच्या रूममध्ये गळफास लावून आयुष्य संपवलं आहे. नितेश ईश्वर मीनेकर असे या 34 वर्षीय प्रियकराचे नाव आहे आणि करिश्मा असे या प्रेयसीचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या आणि आत्महत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (pimpari chinchwad crime news boy friend attack girlfriend and commit suicide shocking crime story) 

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात एक लॉज आहे. या लॉजवर नितेश आणि करिश्माचं भेटण्याचं ठरलं होतं. त्यानुसार करिश्मा तिची दुचाकी घेऊन आधीच पोहोचली होती. त्यानंतर नितेश लॉजजवळ आल्यानंतर दोघांनी संध्याकाळी 4 वाजताच्या सूमारास आतमध्ये प्रवेश केला होता. लॉजमध्ये त्यांनी 208 चा रूम बुक केला होता. 

हे ही वाचा : Sayaji shinde राष्ट्रवादीत! पक्षप्रवेश होताच अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

रूममध्ये गेल्यानंतर त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादानंतर नितेशने धारदारने शस्त्राने करिश्मावर हल्ला केला होता. या हल्ल्यात करिश्मा गंभीररित्या जखमी झाली होती. दोघांमधील कडाक्याचे भांडण पाहून हॉटेल मालकाने तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल पोहोचून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

पोलिसांनी 208 चा दरवाजा ठोठावला असता, कपडे घालतोय,दरवाजा उघडतोय,असं नितेशने आतून सांगितले.मात्र इतक्यात नितेशने गळफास लावून आत्महत्या केली होती. एकीकडे करीश्मा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर दुसरीकडे नितेश हा लटकलेल्या अवस्थेत होता.  

दरम्यान नितेश काही वेळानंतर दरवाजाच उघडत नसल्या कारणाने पोलिसांनी दरवाजा तोडला होता. दरवाजा तोडताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण करिश्माचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.तर नितेशने गळफास लावून आयुष्य संपवलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ करिश्माला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. प्रेमप्रकरणातूम ही हत्या आणि आत्महत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज! योजनेबाबत सरकारने दिली मोठी अपडेट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT