Nagpur Spa: '7C वेलनेस'मध्ये सुरू होता भलताच कांड, स्पामध्ये 'तो' आत शिरला अन्...
Nagpur Spa Center: नागपूरमध्ये स्पा सेंटरच्या आडून चालणारा वेश्या व्यवसाय उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठं यश आलं. '7 C वेलनेस'वर छापा टाकून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: नागपूर शहरात मनीष नगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये स्पा आणि वेलनेसच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत '7 C वेलनेस' या स्पा सेंटरवर 19 मार्च 2026 रोजी छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, मुख्य आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांची कारवाई कशी झाली?
बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम कार्यरत होती. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जाळे टाकले. एका बनावट ग्राहकाला पाठवून स्पा सेंटरमध्ये देह व्यापार चालू असल्याची खात्री पटवली. त्यानंतर सायंकाळी सुमारे 5.30 वाजता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. छाप्यादरम्यान देह व्यापार चालू असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले.
हे ही वाचा>> बायको कामावर गेल्यानंतर घरात सावत्र बापाचा 12 वर्षाच्या लेकीवर लैंगिक अत्याचार, नंतर जीवे मारण्याची दिली धमकी
कोणत्या महिलांची सुटका?
छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यापैकी एक महिला ओडिशा राज्यातील आहे, तर दुसरी इतर राज्यातील असल्याचे सांगितले जात आहे. या महिलांना पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवून बाहेरच्या राज्यांतून आणले गेले होते आणि त्यांच्यावर देह व्यापार करायला भाग पाडले जात होते. सुटका झालेल्या महिलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून, त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली जात आहे.
आरोपी आणि जप्त माल
मुख्य आरोपी म्हणून एका महिलेला अटक करण्यात आली. ती स्पा सेंटर चालवत होती आणि बाहेरच्या राज्यांतील गरीब महिलांना पैसे देण्याचे आमिष दाखवून देह व्यापारात ढकलत होती. छाप्यादरम्यान पोलिसांनी 5 हजार रुपये रोख, मोबाइल फोन आणि इतर वस्तू जप्त केल्या. एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.










