Pune Crime : बॉयफ्रेंडसोबत पळाली अन् RPF जवानाची पडली नजर; 5 दिवस करत राहिले बलात्कार

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Pune Crime Chhattisgarh Girl ran away with Boyfriend to Pune RPF Jawan and his friend raped her for 5 Days
Pune Crime Chhattisgarh Girl ran away with Boyfriend to Pune RPF Jawan and his friend raped her for 5 Days
social share
google news

Chhattisgarh Girl Rape in Pune: गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. कधी हत्या तर कधी बलात्कार… महिलांसाठीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. पुण्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानाने 17 वर्षांच्या मुलीवर पाच दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. (Pune Crime Chhattisgarh Girl ran away with Boyfriend to Pune RPF Jawan and his friend raped her for 5 Days)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी मूळची छत्तीसगडची रहिवासी आहे. ती तिच्या 25 वर्षीय बॉयफ्रेंडसह पुण्याला पळून आली होती. आरपीएफ जवानाने दोघांनाही खोलीत डांबून ठेवले आणि 17 वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केला.

वाचा : ‘विषारी नशाबाजांचा ‘वर्षा’वर सुळसुळाट’, एल्विशवरुन विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव

पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

पीडित मुलीच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरपीएफ जवान अनिल पवार आणि कमलेश तिवारी या दोघांना आरोपी ठरवण्यात आलं आहे. कमलेश हा सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी ऑर्गनायझेशनचा (एनजीओ) कर्मचारी असल्याचे मिळालेल्या माहितीतून समजते. पीडित मुलगी दहावीत शिकतेय आणि छत्तीसगडमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते. तिला तिचा प्रियकर लीलाधर ठाकूर याच्याशी लग्न करायचे होते, म्हणून दोघेही रेल्वेने पुण्याला पळून आले.

हे वाचलं का?

पीडिता आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत नेमकं काय घडलं?

दोघेही 12 सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यानंतर काही लोकांनी दोघांनाही रेल्वे पोलिसांकडे नेले. आरपीएफ जवान अनिल पवार हे त्यावेळी कर्तव्यावर होते. त्यांनी पीडित तरुणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला बराच वेळ बसवून ठेवलं. यानंतर आरोपी अनिल पवार याने दोघांना रेल्वे कॉलनीतील एका खोलीत बंद करून पैशांची मागणी केली. त्यानंतर मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

वाचा : Manoj Jarange : जरांगेंची प्रकृती कशी? डॉक्टर म्हणाले, “किडनी, लिव्हरला…’

शेवटी वडीलच आले धावून अन् पीडितेची केली सुटका

दुसऱ्या दिवशी एनजीओ कर्मचारी कमलेश तिवारी याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पैसे घेऊन लीलाधर ठाकूरला (बॉयफ्रेंड) सोडून दिल्याचं समजलं. तर मुलीला खोलीत डांबून ठेवले होते. आरोपींना संधी मिळताच ते अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायचे.

ADVERTISEMENT

यादरम्यान, पीडितेचे वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका करण्यात आली. पीडित मुलगी छत्तीसगडमध्ये पोहोचल्यावर तिने पोलिसांना संपूर्ण आपबीती सांगितली. या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला. तत्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

ADVERTISEMENT

30 सप्टेंबर रोजी छत्तीसगड पोलिसांनी हे प्रकरण पुणे जीआरपीकडे सोपवले. याप्रकरणी पुणे जीआरपीने एका आरोपीला अटक केली आहे. न्यायाधिशांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

वाचा : Manoj Jarange : CM शिंदे म्हणाले, ‘सरसकट नाही’, जरांगेंनी गोंधळ केला दूर

पीडित मुलीच्या बॉयफ्रेंडविरूद्धही गुन्हा दाखल

जीआरपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एनजीओ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून आरोपी आरपीएफ जवानाचा शोध सुरू आहे. छत्तीसगड पोलिसांनी 25 वर्षीय मुलाविरुद्धही गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT