कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्याच्या रागातून घेतला जीव, शिरूरमधील ‘त्या’ हत्येचं गुढ उलगडलं

मुंबई तक

–स्मिता शिंदे, शिरुर दोन दिवसांपूर्वी शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील बाभुळसर खुर्द गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा उलगडा झाला असून, मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्याच्या रागातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन मित्रांमधील मोबाईलवरील संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल केली म्हणून मारायला गेलेल्या आरोपीने मुलगा समजून त्याच्या वडिलांनाच ठार केलं. मुलाचे वडील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्मिता शिंदे, शिरुर

दोन दिवसांपूर्वी शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील बाभुळसर खुर्द गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा उलगडा झाला असून, मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्याच्या रागातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

दोन मित्रांमधील मोबाईलवरील संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल केली म्हणून मारायला गेलेल्या आरोपीने मुलगा समजून त्याच्या वडिलांनाच ठार केलं. मुलाचे वडील उन्हाळा असल्याने घरासमोरील ओट्यावर झोपलेले होते.

नेमकं प्रकरण काय?

शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीतील बाभुळसर खुर्द येथे जालिंदर सुदाम ढेरे हे घरासमोरील ओट्यावर झोपलेले होते. त्यांच्या छातीवर, गळ्यावर, हातावर व पाठीवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ५ मे रोजी घडली होती.

मयत जालिंदर ढेरे यांची पत्नी अर्चना जालिंदर ढेरे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा पुरावा आढळून न आल्याने आरोपीचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं.

उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यातील तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक असे सदर गुन्हयाचा समांतर तपास करत होतं.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहा. फौज दत्तात्रय शिंदे, पो. हवालदार वैभव मोरे, पो.कॉ. विजय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ यांनी बाभुळसर व कई परिसरात झाडाझडती घेतली.

त्यानंतर ६ मे रोजी पहाटे ७ वाजता गुन्हयातील निष्पन्न आरोपी निखिल सतीष थेऊरकर (वय १९ वर्षे, रा. कर्डे, ता. शिरुर, जि. पुणे) यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने सदरील गुन्ह्याची कबूली दिली.

हत्या का केली?

मयत जालिंदर ढेरे यांचा मुलगा उत्कर्ष व आरोपी निखिल थेऊरकर यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी कर्डे गावचा माजी उपसरपंच गणेश रोडे याचा खून करण्याबाबत फोनवरून संभाषण झाले होते.

ते संभाषण उत्कर्ष ढेरे याने रेकॉर्डिंग करुन गणेश रोडे याला इतरांना पाठविलं होतं. याच कारणावरून उत्कर्ष ढेरे व निखिल थेऊरकर यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे निखिल थेऊरकर हा उत्कर्ष ढेरे याला मारण्याच्या तयारीमध्ये सोबत धारदार कोयता घेऊन उत्कर्ष ढेरे याच्या घरी आला होता.

त्यावेळी उत्कर्ष ढेरे हाच घरासमोर झोपलेला आहे, असं समजून आरोपी निखिल थेऊरकर याने जालिंदर सुदाम ढेरे यांच्यावर कोयत्यानं वार करुन त्यांना गंभीर जखमी केलं. यातच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp