Vanraj Andekar: बहिणींनीच भावाची सुपारी दिली, दाजींनी असा केला वनराजचा गेम... Inside स्टोरी!
Vanraj Andekar Murder: पुण्यातील वनराज आंदेकर याची नेमकी हत्या कशी झाली आणि या संपूर्ण प्रकरणामागची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून
कौटुंबिक आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या
वनराजच्या दोन्ही बहिणी आणि नवऱ्यांना अटक
Vanraj andekar latest news: पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj andekar) भर चौकात हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कुटुंबातील काही जणांनीच घडवून आणली असल्याचं समोर आलं आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्यांनी रचल्याची धक्कादायक माहिती बंडू आंदेकरांनी पोलिसांना दिली आहे. अशा प्रकारची माहिती एफआयआरमध्ये देखील देण्यात आली आहे. (pune crime sisters along with their husbands killed their brother how exactly vanraj andekar was killed read inside story)
कौटुंबिक आणि प्रॉपर्टीच्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचे देखील प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात वनराजच्या दोन्ही बहिणींना देखील अटक करण्यात आली आहे. सोबतच या दोघींच्या नवऱ्यांना देखील अटक केली आहे.
वाचा संपूर्ण Inside स्टोरी
रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर चुलत भावासह इमानदार चौकात उभा होता. यावेळी काही लोकांनी त्यांना मारहाण केली. आणि नंतर गोळीबार करण्यात आला. शिवाय कोयत्यानं देखील वार करण्यात आल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा राऊंड फायर केले. वनराज यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी परिसरातील लाईट घालवण्यात आली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Crime News: 70 वर्षाच्या महिलेला घरी बोलावलं, बलात्कार करुन हत्या.. दोन दिवस मृतदेहसोबत काय करत होता आरोपी?
आंदेकरच्या घरी काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला. आधी बाईकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकरला तातडीने केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू त्याचा मृत्यू झाला.
वनराज 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराजची आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले आहेत. वनराज यांची बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आशिर्वादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता, अशी सुद्धा माहिती आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Pune Murder: भर रस्त्यात 5 गोळ्या झाडल्या, माजी नगरसेवकाच्या हत्येनंतर पवारांचा नेता संतापला!
गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. एका बहिणीने वनराजला 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकीसुद्धा दिली होती. वनराजला आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यातच असायचा. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर हा घोळका नव्हता. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता.
त्याचवेळी 5 ते 6 दुचाकीवरुन 10 ते 12 हल्लेखोर आले. त्यांच्यापैकी एकाने आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यात आंदेकर जागेवरच कोसळला. अवघ्या एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेले सर्व हल्लेखोर तिथून पळाले. नंतर लोकांनी वनराज आंदेकर याला जखमी अवस्थेत के ई एम रुग्णालयात नेले, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT