Pune Murder : दारू पिऊन दोस्तीत केली कुस्ती, अन् नंतर सगळं भयानकच घडलं
Pune Murder: पुण्यात सहा महिन्यापूर्वी पोलिसांकडे एका आईने आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर सहा महिन्यांनी मात्र त्यांच्या मुलाची हत्या त्यांच्याच मित्राने केली होती हे उघड झाले. मात्र त्याची हत्या इतक्या धक्कादायकपणे केली होती की, पोलिसही अचंबित झाले.
ADVERTISEMENT
Pune Crime : पुण्यातील गुन्हेगारीच्या विश्वातील अनेक घटना धक्कादायक आहेत. पुणे पोलिसांकडून (Pune Police) गुंतागुंतीचे अनेक गुन्हे अगदी हुशारीने तपास पूर्ण करुन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. असाच प्रकार सहा महिन्यापूर्वी पुण्यात घडला होता. सहा महिन्यापूर्वी एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा खुलासा आता सहा महिन्यानंतर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तपास पूर्ण केल्या नंतर मात्र धक्कादायर माहिती समोर आली आहे. जी व्यक्ती सहा महिन्याभरापूर्वी बेपत्ता (Missing case) होती, त्या व्यक्तीला त्याच्या मित्रानेच त्या व्यक्तीला संपवले होते अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आता तपास पूर्ण करुन आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर त्या आरोपीने मित्राला का मारले (Murder) होते, तो सगळा वृत्तांत त्याने पोलिसांना सांगितला आहे. (pune murder friend in Pune drinking after six months police investigation revealed crime)
ADVERTISEMENT
सोन्याची चैन घेऊन घराबाहेर
पुण्यातील दिनेश दशरथ कांबळे हा गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या आईने तो बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिसात दिली होती. त्यानंतर दशरथचा कित्येक पोलीस शोध घेत होते. मात्र तो सापडला नव्हता. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी त्याच्या घरीही केली. त्यावेळी तो कित्येक दिवस घरीच येत नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. तसेच त्याच्या घरी एकदा त्याच्या वडिलांची सोन्याची चैन चोरल्याच्या घटनेवरून त्याला रागावण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याने पुन्हा घरातील सोन्याची चैन घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा घरी कधीच परत आला नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती.
आईने केली तक्रार
दिनेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यापासून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची त्याच्या मित्राकडे चौकशी केली होती. त्यावेळी पोलिसांना समजले की, तो 15 मार्च 2023 रोजी मित्र सिद्धांत आणि प्रतिक सरवदे या दोघांसोबत दारु पिण्यासाठी गेला होता.
हे वाचलं का?
दारुने केला घात
दिनेश मित्रांसोबत दारु पिण्यासाठी गेला होता, मात्र दारु पिल्यानंतर दिनेश आणि प्रतिक यांच्यामध्ये वाद झाला होता. दिनेशने प्रतिकच्या पत्नीबद्दल अश्लिल शब्द वापरले होते. त्यावरून वाद होऊन प्रतिकने दिनेशच्या डोक्यात दगड घातला होता. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून त्याला नाशिक फाट्यावरील पुलावरून खाली फेकून देण्यात आले, आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. हा सर्व घटनाक्रम त्याच्या मित्राने पोलिसांना सांगितला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT