Pune Accident: T.V साठी 1 तास.. खेळायला 2 तास, अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात काय-काय करणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune porsche accident minor accuse juvenile home one hour tv two hour playing game vishal agarwal
अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातला दिनक्रम
social share
google news

Pune Porsche Accident : ओंकार वाबळे, पुणे :  पुण्याच्या पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी (बिल्डरपुत्र) याचा जामीन रद्द करून त्याची रवानगी आता बालसुधारगृहात (juvenile home) करण्यात आली आहे. येत्या 5 जूनपर्यंत आरोपीला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान बालसुधारगृहात त्यांचा संपूर्ण दिनक्रम कसा असणार आहे. याची माहिती आता समोर आली आहे.  (pune porsche accident minor accuse juvenile home one hour tv two hour playing game vishal agarwal)  

बालसुधारगृहात अल्पवयीन आरोपीच्या दिवसाची सुरूवात सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. त्यानंतर त्याला नाश्त्याला अंडी, पोहा, उपमा आणि दुध मिळणार आहे. नाश्त्यानंतर त्याला प्रार्थना करावी लागणार आहे. तसेच तीन तास भाषा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच त्याला टीव्ही पाहण्यासाठी 1 तास दिला गेला आहे. आणि दोन तास त्याला खेळण्यासाठी देण्यात आले आहेत. नेमका दिनक्रम कसा आहे, तो जाणून घेऊयात.

हे ही वाचा : Ravindra dhangekar : "या 'डिल'मध्ये पोलीस आयुक्तही सहभागी", धंगेकरांची फडणवीसांकडे मोठी मागणी

किती वाजता उठणार? 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बालसुधारगृहात अल्पवयीन आरोपीला आठ वाजता उठावे लागणार आहे. इथून त्याची सकाळ सुरू होणार आहे.

नाश्ता : आरोपीला  10 वाजता नाश्ता करता येणार आहे. नाश्त्याला त्याला अंडी, पोहा, उपमा आणि दुध मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

प्रार्थना आणि क्लासेस : सकाळी 11 वाजता इतर मुलांसोबत त्याला प्रार्थनेत सहभागी होता येणार आहे. यानंतर त्याचे शिकवणीचे वर्ग सुरु होणार आहेत. 

ADVERTISEMENT

दुपारचे जेवण : अल्पवयीन आरोपीला दुपारी 12:30 वाजता जेवता येणार आहे. त्यानंतर त्यांना दुपारी 4 वाजेपर्यंत विश्रांती घेण्याची परवानगी आहे.

टीव्ही पाहायची वेळ: आरोपीला संध्याकाळी 4 वाजता नाश्ता दिला जाणार आहे. तर  4 ते 5 या वेळेत त्यांना एक तास टीव्ही पाहण्याची परवानगी आहे.

खेळण्याची वेळ:  आरोपींना संध्याकाळी 5 ते 7 असे दोन तास खेळण्याचा वेळ दिला जातो. त्यांना फुटबॉल आणि व्हॉलीबॉल सारखे खेळ खेळता येणार आहेत. 

हे ही वाचा : 'देवेंद्रजी, महाराष्ट्राला 'या' प्रश्नाचं उत्तर द्या', सुप्रिया सुळेंनी पकडलं खिंडीत

रात्रीचे जेवण: बालसुधारगृहात रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 वाजता दिले जाते, त्यात भाज्या, चपाती आणि भात असतात.

दिवसाचा शेवट : रात्री 8 वाजता दिवसाची सांगता करण्यासाठी कैदी त्यांच्या वसतिगृहात परततात.

दरम्यान या घटनेत अल्पवयीन आरोपीला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. पण आरोपी प्रौढ आहे का? हे सिद्ध करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या केल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जातो. त्या चाचण्या करण्यासाठी कोर्टाला काहीसा वेळ लागणार आहे. दरम्यान या प्रकरणात पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT