Ravindra dhangekar : "या 'डिल'मध्ये पोलीस आयुक्तही सहभागी", धंगेकरांची फडणवीसांकडे मोठी मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
pune accident news : देवेंद्र फडणवीस, अमितेश कुमार, रवींद्र धंगेकर.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोर्श अपघात प्रकरण

point

रवींद्र धंगेकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

point

अमितेश कुमार यांची बदली करा, अशी धंगेकर यांची मागणी

Ravindra Dhangekar on Pune Accident News : १८ मे रोजी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणात आता पोलीस आयुक्त अडचणी आले आहेत. कसब्याचे आमदार आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. (Ravindra Dhangekar has demanded from Devendra Fadnavis that Pune Police Commissioner Amitesh Kumar should be transferred)

बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मंद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दुचाकी उडवली. यात एका तरुणी इंजिअरचा आणि एका तरुणीाचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झालेले आहेत. धंगेकर यांनी आता थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

"ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली,असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको", असे म्हणत धंगेकर यांनी भूमिका मांडली आहे. 

Pune Accident : रवींद्र धंगेरकर यांचे म्हणणे काय?

काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दीर्घ पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी भूमिका स्पष्ट करताना आयुक्तांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केल्या आहेत. धंगेकर यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे, हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते."

हेही वाचा >> डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू, 25 ते 30 कामगार गंभीर जखमी

"आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे.त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्या पासून करायला हवी.या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनने कुणावरही कारवाई केलेली नाही,याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या 'डिल' मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी,अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत आहे."

ADVERTISEMENT

पुढे धंगेरकर म्हणतात, "या प्रकरणात पोलीस कमिशनर यांच्यावर संशय निर्माण अशा काही बाबी यात समोर आल्या आहेत", असे म्हणत धंगेकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत. 

ADVERTISEMENT

1) "इतक्या गंभीर प्रकरणात पहिली F.I.R दाखल करताना अक्षम्य अशा चुका करण्यात आल्या आहेत,ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो. आरोपी स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली, तरी देखील कलम १८५ लपवण्यात आले. तसाच प्रकार ३०४ कलममध्ये सुद्धा केला. हे कलम जर अगोदर लावले असते, तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती."

हेही वाचा >> ठाकरेंचा सांगलीत 'गेम'; काँग्रेसचा मेसेज, विशाल पाटलांना ताकद?

2) "कुठल्याही अपघातात त्या कार मधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते. या प्रकरणात इतर २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे. FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही. अर्थात यासाठी त्या मुलांच्या पालकांकडून वेगळी डिल झाली आहे."

3) "राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्या FIR पासून ३०४ कलम होते, हे ठासून सांगितले. प्रत्यक्षात पहिल्या FIR मध्ये त्याचा उल्लेख देखील नाही. याचाच अर्थ पोलीस कमिश्नर यांनी गृहमंत्र्यांची देखील दिशाभूल केली आहे."

4) "आज या घटनेचा ५ वा दिवस आहे.या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले.सर्व व्यवस्थेची बदनामी झाली परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही.याचा अर्थ तपास अधिकाऱ्यांपासून ते कमिश्नरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे."

हेही वाचा >> 'देवेंद्रजी, महाराष्ट्राला 'या' प्रश्नाचं उत्तर द्या', सुप्रिया सुळेंनी पकडलं खिंडीत

5) "काल अचानकपणे पुणे शहरातील ४ ते ५ पब आणि रूफ टॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. जर हे सर्व अवैध होतं, तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली? पोलीस कमिशनर इतक्या दिवस त्यांच्या पाकिटावर मेहरबान होऊन त्यांना पब चालविण्याची मूभा देत होते का?"

असे मु्द्दे उपस्थित करत धंगेकरांनी पुढे म्हटले आहे की, "त्यामुळे पुणेकरांच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी विनंती आहे की ,विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची, पोलीस प्रशासनाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या पोलीस कमिश्नर यांच्या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यांची तातडीने बदली करण्यात यावी", अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT