Pune Accident : बिल्डरपुत्राच्या बचावासाठी आमदाराचा दबाव? आरोपांवर सुनील टिंगरेंनी दिलं स्पष्टीकरण
Mla Sunil Tingre on Pune Accident : माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकला. तसेच पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला लावल्याचा आरोप केला होता.
ADVERTISEMENT

Mla Sunil Tingre on Pune Accident News : पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार (Pune Porsche Accident) चालवणाऱ्या अल्ववयीन मुलाने दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यात या घटनेत आरोपी अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (pune porsche accident news mla sunil tingre reaction on allegation builder vishal agarwal son pune news)
पुण्यातील या अपघाताच्या घटनेत आरोपी मुलाला वाचविण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा हात असल्याचा आरोप होत होता. माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकला. तसेच पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुण्याच्या या अपघाताच्या घटनेत सुनील टिंगरे यांचे नाव चर्चेत आले होते.
हे ही वाचा : Lok Sabha : कपिल पाटलांचा 'तो' Video रोहित पवार चिडले!
पुण्यातील या अपघाताच्या घटनेत आपले नाव समोर आल्यानंतर सुनिल टिंगरे यांनी एक्सवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. नेमकं टिंगरे त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात.
सुनिल टिंगरेंची पोस्ट जशीच्या तशी
कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो.










