Sindhudurg : पुण्यातील 6 विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले, नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

pune sankalp sainik academy 6 students from pune drowned devgad sea
pune sankalp sainik academy 6 students from pune drowned devgad sea
social share
google news

Sindhudurg News: पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची (sankalp sainik academy) सहल देवगडला (Devgad) गेली होती. त्यावेळी देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्वजण उतरले होते. समुद्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने 6 जण बुडाले आहेत. त्या 6 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर आकाश तुपे याला वाचवण्यात यश आले आहे. बुडालेल्यांपैकी राम डिचवलकर हा मात्र अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर समु्द्रावर मोठी गर्दी झाली होती. तर राम डिचवलकर या शोध घेण्याचे काम सुरु असून बचाव पथक त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे देवगड शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

किनाऱ्यावर गर्दी

पुण्यातील हे सर्वजण सहलीसाठी कोकण सहलीसाठी आले होते. दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान ते समुद्राचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरले होते मात्र त्यातील 6 जण पाण्यात बुडाले. त्या 6 पैकी 6 जणांना बाहेर काढण्यात आले मात्र त्यापैकी 4 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तर यातील एकाचा जीव वाचला असून तर अजूनही एक जण बेपत्ता आहे. समुद्रकिनाऱ्यावर देवगडवाशीयांनी आणि मोठी गर्दी केली होती, बुडालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर देवगड प्राथमिक आरोग्य केंद्रातही मोठी गर्दी झाली होती.

हे ही वाचा >> Jagdeep Dhankhad : PM मोदींसमोर झुकले, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर धनकड स्पष्टच बोलले

आनंद जीवावर बेतला

या सहलीसाठी पुण्यातून साधारण 35 जण विद्यार्थी देवगडला आले होते. त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना समुद्रातील पाण्याचा अंदाज आला नाही, आणि विद्यार्थी समुद्रात बुडाले. यावेळी इतर विद्यार्थ्यांनी आरडोओरड केल्यानंतर नागरिकांनी धावाधाव केली. विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. तर त्यातील 4 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुटुंबीयांना मानसिक धक्का

समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. किनाऱ्यावर मोठी गर्दी जमल्यानंतर मदत करतानाही अनेक अडचणी येत होत्या. पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना कळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

हे ही वाचा >> Beed Crime: दगडाने डोके ठेचून हत्या, पाच मामांनी मिळून भाच्याला का संपवलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT