Jagdeep Dhankhad : PM मोदींसमोर झुकले, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर धनकड स्पष्टच बोलले

मुंबई तक

सोशल मीडियावर उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमस्कार केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होताच राजकीय गदारोळ माजला आहे. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यावरूनच त्यांनीही त्यांच्या टीकेला उत्तर देताना संस्काराची भाषा वापरली आहे.

ADVERTISEMENT

Bowing is my culture Rajya Sabha Speaker Dhankhad regrets being trolled in the House
Bowing is my culture Rajya Sabha Speaker Dhankhad regrets being trolled in the House
google news

Jagdeep Dhankhar: सोशल मीडियावर उपराष्ट्रपतींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकमेकांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. त्यावरूनच विरोधकांनी म्हणजेच काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला होता. उपराष्ट्रपती किती खाली झुकणार आहेत ? असा सवाल काँग्रेस (Congress) नेत्यांनी केला होता.

अजून किती वाकणार?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर टीका करताना मणका नसलेली, अजून किती वाकणार आहात, आता हाच दिवस पाहायाच बाकी होता अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून आता उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीही आपले मौन सोडत विरोधकांना संस्कारावरून सुनावले आहे.

हे ही वाचा >> ‘पोषण आहारात अंडी देण्याऐवजी…’, भाजप अध्यात्मिक आघाडीची मोठी मागणी

ही माझं मूल्ये

जगदी धनकड यांनी त्या व्हिडिओनंतर विरोधी पक्षाने केलेल्या त्या टीकेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. वाकून नमस्कार करणे ही माझी सवय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नमस्कार करणं ही माझं मूल्यं आहे. असं सांगत नमस्कार करताना माझ्या समोर कोण आहे ते महत्वाचं नाही मात्र अशा प्रकारच्या टीका झाल्या की, माझ्या मनाला खूप वेदना होतात असंही त्यांनी म्हटले आहे.

व्हिडीओ व्हायरल

उपराष्ट्रपतींच्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर त्यांनीही विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. तुम्ही संस्कारांची थट्टा करू नये. कारण वाकून नमस्कार करणे हा येथील सांस्कृतिक वारसा आहे. तुम्ही म्हणता पदाची काही गरिमा आहे की नाही मात्र पदाची प्रतिष्ठा ही तेव्हाच राखली जाते जेव्हा कोणतीही व्यक्ती ही त्याच्या वृत्तीतून नम्रपणा दाखवते. तुम्ही केलेली टीका ही मला वेदना देणारी ठरली कारण मी ज्यांचा आदर करतो त्याच माणसांकडून ही टीका केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?