Dinesh Sharma : ‘माझी सहनशक्तीच संपलीय’, माजी IPS अधिकाऱ्याने स्वत:ला का संपवलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

A shocking incident has taken place that a retired IPS officer committed suicide by shooting himself. He committed suicide at his residence in Vishal Khand Parisar in Lucknow, Uttar Pradesh. Dinesh Sharma had taken an extreme step out of depression.
A shocking incident has taken place that a retired IPS officer committed suicide by shooting himself. He committed suicide at his residence in Vishal Khand Parisar in Lucknow, Uttar Pradesh. Dinesh Sharma had taken an extreme step out of depression.
social share
google news

देशभरात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. त्यात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने (ips officer) स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश कुमार शर्मा (73) असे या मृत आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने लायसेन्स रिव्हॉलव्हरने आयु्ष्य संपवलं आहे. आत्महत्येपुर्वी त्याने सुसाईड नोट (Suicide Note) देखील लिहली आहे.या सुसाई़ड नोटमध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. दरम्यान या घटनेने परीसरात खळबळ माजली आहे. (retired ips officer commits suicide in lucknow uttar pradesh)

ADVERTISEMENT

1975 बॅचचे आयपीएस अधिकारी (ips officer) दिनेश कुमार शर्मा (73) यांनी लायसेन्स् रिव्हॉलव्हरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशच्या लखनऊमधील विशाल खंड परीसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली होती. नैराश्यातून दिनेश शर्मा यांनी टोकाचं पाऊलं उचललं होतं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचसोबत पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे.

हे ही वाचा : मोबाइल गेममधून सुरु होतं मुलांचं धर्मांतर, काय आहे मुंब्रा कनेक्शन?

सुसाईड नोटमध्ये काय?

‘मी आत्महत्या करत आहे कारण मला चिंता आणि नैराश्य सहन होत नाही. मी माझी ताकद आणि आरोग्य गमावत आहे. त्यामुळे माझ्या आत्महत्येला कोणालाही देखील जबाबदार धरू नये, असे आयपीएस अधिकारी दिनेश कुमार शर्मा यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहले होते. सुसाईड नोट लिहल्यानंतर दिनेश शर्मा यांनी डोक्यावर लायसेन्स रिव्हाल्ह्वर लावून गोळी झाडून आत्महत्या केली. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातील खुर्चीवर पडला होता. तसेच आत्महत्येसाठी वापरलेली लायसेन्स रिव्हॉलव्हर देखील घटनास्थळी सापडली होती.

हे वाचलं का?

दिनेश शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला आहे. ते चांगले अधिकारी होते, त्यांच्यासोबत माझे कौटुंबित नाते होते. ते एक चांगले क्रिकेटर देखील होते, यासोबत ते आयपीएस क्रिकेट टीमचा देखील एक भाग होते, अशी माहिती डीजी सुरक्षा विनोद कुमार सिंह यांनी दिली आहे.

दिनेश शर्मा 2010 साली युपी पोलिसांच्या डीजी हाऊसिंग कॉर्पोऱेशन पदावरून निवृत्त झाले होते आणि ते लखनऊमध्ये राहत होते. ज्या घरातून दिनेश शर्मा यांचा मृतदेह ताब्ंयात घेण्यात आला होता. त्या घराला सील करण्यात आले असून आत्महत्येसाठी वापरण्यात आलेली लायसेन्स रिव्हाल्व्हर ताब्यात घेण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT