साक्षीच्या डोक्यात 7 वेळा दगड टाकणाऱ्या साहिलचं सापडलं सोशल मीडिया प्रोफाइल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Delhi Shahbad Dairy Murder Case Video : देशाची राजधानी दिल्ली साक्षी हत्याकांडाने (sakshi murder) हादरली आहे. या हत्याकांडात माथेफिरू बॉयफ्रेंड साहिलने (Sahil) 40 चाकूचे वार करून साक्षीची निघृण हत्या केली, इतक्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने दगडाने ठेचून देखील हत्या केली.या हत्येंने संपूर्ण देश हळहळला आहे. तसेच राजकीय वातावरण देखील तापले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी साहिलला (Sahil) उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातून अटक केली आहे. आता या प्रकरणात आरोपींची सोशल मीडियावरील प्रोफाईल समोर आली आहे. या प्रोफाईलमधून देखील आरोपीबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. (sakshi murder case sahil instagram profile hookah alcohol delhi shahbad dairy murder case)

ADVERTISEMENT

हत्येचा प्लान बनवला होता?

आरोपी साहिल (Sahil) पुत्र सरफराज आणि अल्पवयीन साक्षी (Sakshi Murder) (वय 16) हे दोघेही नात्यात होते. साक्षी त्या दिवशी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घरातून निघाली होती. या दरम्यान साक्षीच्या घराच्याच रस्त्यावर आरोपी साहिलने तिला रोखले आणि वाद घालायला सुरूवात केली. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून आरोपी साहिलने खिशातून चाकू काढून साक्षीवर सपासप वार करायचा सुरूवात केली. अगदी छाती, डोक्यावर त्याने श्वासही न घेता तब्बल 40 वार करून हत्या केली. साहिलच्या या हल्ल्यानंतर साक्षी जागच्या जागीच खाली पडली. आरोपी साहिलचा (Sahil) राग इतक्यावर शमला नाही तर त्याने दगडाने ठेचून देखील तिची हत्या केली. एका माथेफिरूप्रमाणे त्याने हे हत्याकांड केले होते. या हत्येनंतर जमावासमोर ओरडून त्याने पळ काढला होता.

हे ही वाचा : थेट डोक्यातच घुसवला चाकू अन् 40 वार… साक्षीच्या भयंकर हत्येची Inside Story

गर्लफ्रेंड साक्षी (Sakshi Murder) हिच्या हत्येमागचं कारण त्यांच्या दोघांमधील भांडण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि साहिल दोघेही नात्यात होते. रविवारी त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाच्या दुसऱ्या दिवशी साहिलने तिची निघृण हत्येचा कट रचला होता.या संपूर्ण घटनेने देश हादरला आहे.

हे वाचलं का?

आरोपी नशेचा आहारी…

आरोपी साहिल हा नशेचा आहारी गेला होता, असे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्पष्ट होत आहे. साहिलची इन्टाग्राम प्रोफाईल पाहिली असता, तो दारू आणि हुक्का पिण्याचा शौकीन असल्याचे स्पष्ट होते. साहिलने हुक्का पितानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीड़ियावर पोस्ट केले आहेत. यासोबत त्याने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओत तो मित्रांसोबत दारू पितानाही दिसला आहे. त्यामुळे साहिलच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून तो नशेचा किती आहारी गेलाय हे स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा : Delhi Crime: सपासप.. चाकूचे 40 वार नंतर दगडाने केला गर्लफ्रेंडचा चेंदामेंदा

साहिलला उत्तर प्रदेशमधून अटक

दरम्यान या साक्षी हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर साक्षीच्या वडिलांनी शाहदाबाद पोलीस ठाण्यात आयपीसी धारा 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी साहिलला उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT