Satara: खून करुन फरार.. तब्बल 36 वर्षानंतर सापडला आरोपी, अंगावर काटा आणणारी घटना

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime News : गेल्या 36 वर्षांपासून हत्येच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर 1987 मध्ये हे संपूर्ण हत्येचं प्रकरण घडलं होतं. ज्याला आता तब्बल 36 वर्ष उलटली आहेत. पण अखेर एवढ्या प्रदीर्घ काळानंतर या प्रकरणाचा खरा इतिहास उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Satara Crime News Accused absconding for the last 36 years in the crime of murder Finally the police arrested him)

ADVERTISEMENT

भीमराव सिध्द्राम तेली हा व्यक्ती मनव नावाच्या गावात, ता. कराड, जिल्हा सातारा येथे राहत होता. या व्यक्तीचा त्याच गावात राहणारे बाळू सरगर, दत्तु यलमारे या दोन लोकांनी सन 1987 मध्ये हत्या केली होती. या हत्येच्या कारणावरून यातील आरोपी लाला सिध्द्राम तेली, संपत सिध्द्राम तेली, महादेव सिध्द्राम तेली वदत्तु आण्णा तेली यांनी पाल ता. कराड येथे सदर गुन्हयातील गुन्हेगार दत्तु ज्ञानु यलमारे यांची कोयता, कुऱ्हाड यांसारख्या घातक हत्याराने वार करू निघुर्ण हत्या केली होती.

Rules Changes 1st October : देशात उद्यापासून बदलणार ‘हे’ 5 महत्त्वाचे नियम!

या हत्येचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी लाला सिध्द्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून सुमारे 36 वर्ष फरार झालेला होता. आता तब्बल 36 वर्षांनंतर म्हणजे काल (29 सप्टेंबर 2023) रोजी पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि तपास करून त्यांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपी लाला तेली याला अटक केली.

हे वाचलं का?

कराड शहरात गणेशोत्सव बंदोबस्ताकरीता हजर असताना अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील फरार आरोपी लाला सिध्द्राम तेली हा त्याच्या राहत्या घरी आलेला आहे. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास कडव यांच्या पथकासह बातमीची खात्री केली.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले ‘OBC ना…’

यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि संशयितास त्याच्या राहत्या घरातून मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या शिताफीने पकडलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उंब्रज पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्याची तोडफोड; नेमकं काय घडलं?

ही कामगिरीमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक विश्वास कडव, सहा. पोलीस उपनिरीक्षक नितीन शेळके, मकरंद कवडे, पो.हवा. राकेश देवकर, पो. ना. गणेश जाधव, चालक पोलीस नाईक उदय यादव, पो. कॉ. आशिष पाटील यांनी सहभाग घेतला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT