Sonia Akhtar News : बांगलादेशी महिलेसोबत सौरभचा फ्रेंच किस, सोनियाचा तो व्हिडिओ व्हायरल…

मुंबई तक

ADVERTISEMENT

viral video bangladesh french kiss
viral video bangladesh french kiss
social share
google news

Sonia Akhtar News : बांगलादेशातून नोएडामध्ये पोहचलेल्या सोनिया अख्तरची (Sonia Akhtar) नोएडा पोलिसांनी आता चौकशी पूर्ण केली आहे. पोलिसांनी चौकशीअंती अहवाल तयार करुन तो अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर केला आहे. नोएडा पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर तयार केलेल्या अहवालामध्ये सोनिया अख्तरचा पती सौरभकांत तिवारीबरोबर (saurabh tiwari) केलेले दावे हे खरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सौरभकांत तिवारीने आपल्या मर्जीनुसार धर्म बदलून बांगलादेशामध्ये सोनिया अख्तरबरोबर लग्न केले आहे.

सौरभ-सोनिया प्रकरण खोलात

सोनियाचा दावा आहे की, तिचे लग्न तीन वर्षापूर्वी ग्रेटर नोएडातील सुरजपूर परिसरात राहणाऱ्या सौरभकांत तिवारीबरोबर झाली आहे. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र आता सौरभ तिच्या बरोबर राहण्यास नकार देत आहे. मात्र या प्रकरणाचा तपास चालू असतानाच डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Yavatmal Murder : पैसे देणाऱ्याचाच गळा चिरला; मध्यस्थी करणाऱ्याचे डोके फोडले, कुटुंबीय सुन्न

तोच व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सौरभकांत तिवारी आणि सोनिया अख्तरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती दोघंही एकमेकांबरोबर नृत्य करत त्यांनी किसही केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढत आहे. तपासा दरम्यान दोघांकडूनही पोलिसांसमोरच आपापली बाजू मांडली आहे. या प्रकरणातील सत्यता समोर आणण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

धर्मांतरमुळं गुंता वाढला

पोलिसांच्या तपासानंतर अशी माहिती समोर आली की, सुरजपूरचा राहणारा सौरभ पहिल्यापासूनच तो विवाहित होता. तर त्याचे पहिले लग्न होण्याआधीपासूनच त्याला दोन मुलं होती हेही पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे बांगलादेशातील महिला सोनिया अख्तर दावा करते आहे की, तिने त्याच्याबरोबर लग्न केले आहे. त्याचबरोबर तिने आरोप केला आहे की, सौरभने बांगलादेशात धर्मांतर करुन त्याने लग्न केले आहे. तर लग्नानंतर ही दोघंही भारतात आली आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Madurai Train fire : रेल्वेत गॅस सिलिंडर घेतला अन् डबा पेटला; प्रायव्हेट पार्टी कोचमधील 10 जण होरपळले

सोनियाला पतीसोबतच राहायचे

सोनियाला तिच्या पतीसोबत राहायचे आहे मात्र तिला दुसऱ्यासाठी सोडण्याच्या विरोधात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र सौरभकांत तिवारी यांनी सोनिया अख्तरसोबत राहण्यास नकार दिल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT