28 मुलांवर बलात्कार आणि हत्या, क्रूर सीरियल किलरची थरारक कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

serial killer dean corll candy man rape 28 boys and murder
serial killer dean corll candy man rape 28 boys and murder
social share
google news

देशभरात सीरियल किलिंगच्या (serial killer) अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेतील पीडितांचे शोषण आणि हत्येची क्रुरता पाहून काळजाचा ठोका चुकतो, इतक्या थरारक हे हत्याकांड घडवलं जाते.आता अशीच एक सीरियल किलरची घटना समोर आली आहे. या घटनेतील सीरियल किलरचे नाव कॅंडीमॅन (Candiman) होते. हा कॅंडीमॅन तरूणांना कॅंडी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. या शोषणानंतर कॅंडीमॅन त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. या कॅंडीमॅनने साधारण 28 मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या सीरियल किलरला पोलिसांना (Police) पकड़ता देखील आले नव्हते तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला होता. नेमकी ही सीरियल किलिंगची कहानी काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात. (serial killer dean corll candy man rape 28 boys and murder)

ADVERTISEMENT

सरळ साध्या दिसणाऱ्या व समाजात इतर तरूणांप्रमाणे वागणाऱ्या या सीरीयल किलर कॅंडीमॅनची कहानी खुपच धक्कादायक आहे. 1970च्या दशकात या संपूर्ण घटनाक्रमाला सुरुवात झाली होती. द टेक्सास मंथली रिपोर्टनुसार, या सीरियल किलरचे नावा डिन कोरल होते. 1939 मध्ये फोर्ट वेनच्या इंड़ियानामध्ये जन्मलेल्या कोरल त्याच्या आई-वडिलांसोबत खुश नव्हता. कारण त्यांची नेहमी भांडणे व्हायची. यामुळे कोरलच्या आईने त्यांना तलाक देऊन एका ट्रॅव्हलिंग सेल्समन सोबत लग्न केले होते. या लग्नामुळे ते टेक्सासला राहायला लागले. याच ठिकाणी कोरलच्या आईने आणि सावत्र वडिलांनी कॅंडीची कंपनी उघडली होती. बघता बघता ही कंपनी खुप चांगली चालायला लागली.त्यामुळे कोरलच्या आई-वडिलांनी खुप मोठ्या प्रमाणात कंपनीत कामासाठी तरूणांची भरती केली.

प्रत्येक हत्येनंतर घर बदलायचा…

या सर्व तरूणांसोबत कोरलने खुप चांगली मैत्री करून त्यांना ब्रेकमध्ये खेळण्यासाठी कंपनीमागे एक जागा बनवली होती. या जागेवर तरूणांची कोरल खुप छेड काढायचा. या कंपनीतील 12 वर्षाच्या डेविड ब्रुक्सला कोरल महागडे गिफ्ट देऊन त्याचे लैंगिक शोषण करायचा. तसेच ब्रुक्सला इतर मुलांना घेऊन येण्याची जबाबदारी देखील कोरलने दिली होती. या दरम्यान कोरलने 1970 दरम्यान पहिल्यांदा तरूणाची हत्या केली होती. तत्पुर्वी कोरलची आई कोलोरेडोला शिफ्ट झाली होती. त्यामुळे कोरल एकटाच राहू लागला होता. तसेच तो त्याच्या प्रत्येक हत्याकांडानंतर घर बदलायचा, जेणेकरून तो पोलिसांकड़ून पकडला जाऊ नये.

हे वाचलं का?

पोलिसांना द्यायचा चकवा

कोरलने 1970 दरम्यान पहिल्यांदा तरूणाची हत्या केली होती. या तरूणाचे नाव जेफरी केनन होते. या तरूणाचे अपहरण करून त्याला बेडवर बांधून त्याने त्याचा बलात्कार केला त्यानंतर त्याची हत्या केली होती.या दरम्यान कोरलच्या घरी ब्रुक्सची एंट्री झाली होती. त्यामुळे ब्रुक्सचे तोंड बंद करण्यासाठी त्याला एक महागडी कार खरेदी करून दिली. तसेच कोणत्याही तरूणाला घेऊन आल्यास त्या बदल्यात त्याला 200 डॉलर मिळतील,अशी ऑफर देखील दिली. ही ऑफऱ त्याने स्विकारली. मात्र या कामासाठी त्याने नंतर इलमर वेन हेनल नावाच्या तरूणाला या सीरियल किलींगमध्ये सामील करून घेतले. अशाप्रकारे हेलन ड्रग्ज देऊन 13 ते 20 मुलांना वॅनमध्ये भरून आणायचा. त्यानंतर कोरल त्यांची रेप करून हत्या करायचा. या हत्येनंतर कोरल तरूणांच्या आई-वडिलांना पत्र लिहून, मला चांगली नोकरी मिळाली आहे आणि मी खुश आहे, अशी माहिती द्यायचा. अशी पत्र पाठवून तो पोलिसांच्या तपासाची दिशाभूल करून त्यांना एकप्रकारे चकवा द्यायचा.

ADVERTISEMENT

3 वर्षात 28 मुलांची रेप आणि हत्या

1970 पासून 8 ऑगस्ट 1973 पर्यंत आरोपीने 28 मुलांचा रेप करून हत्या केली. या दरम्यान 8 ऑगस्टला हेनले एका तरूणाला आणि तरूणीला घेऊन आला होता. चौघांनी घरात दारू प्यायली. यानंतर कोरलने त्या मुला-मुलीसह हेनलेला देखील बेडवर बांधले होते. यावेळी कोरलेने त्याला विचारले, तु माझा घरी मुलीला का घेऊन आला. आता मी तुला मारेन. हीच संधी साधत हेनलने कोरलच्या हातून बंदुक हिसकावून त्यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. यामध्ये कोरलची हत्या झाली. त्यानंतर हेनलने संपूर्ण सीरियल किलींगची घटना पोलिसांना जाऊन सांगितली आणि या घटनेचा उलगडा झाला. तसेच पोलिसांनी हेनलला जेलमध्ये टाकून त्याला तूरूंगवास घडवला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT