Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणात पिस्तूल पुरवणारे ‘ते’ दोघे कोण?
शरद मोहोळसोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा. मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही.
ADVERTISEMENT
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 8 आरोपी अटकेत होते. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश होता. आता या दोघांना अटक झाल्याने आरोपींची संख्या 10 वर पोहोचली. आता या मोहोळ हत्या प्रकरणात या दोन आरोपींनी नेमकी काय भूमिका बजाववी आहे. त्यांचा या हत्याकांडात किती हात आहे. हे जाणून घेऊयात. (sharad mohol murder case two new accused arrested those who supplied pistol to sahil polekar pune news)
ADVERTISEMENT
शरद मोहोळ हत्याकांडाचा मास्टरमाईंड मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकर याने चार महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. हत्येपूर्वी सरावासाठी त्याने ही पिस्तुल खरेदी केली होती. या पिस्तुलासह गोळीबार करण्याचा त्याने मुळशीत सराव देखील केला होता. त्यामुळे मोहोळ हत्याकांडासाठी ज्या पिस्तुली वापरण्यात आल्या होत्या. त्या पिस्तुली पुरवणारे आता अटकेत आले आहेत. धनंजय मारूती वटकर (वय 25) राहणार कराड आणि सतीश संजय शेडगे (वय 28)अशी या आरोपींची नावे आहेत.
हे ही वाचा : Nawab Malik : ईडीचा विरोध मावळला! मलिकांना मिळाला ‘सुप्रीम’ दिलासा
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मास्टरमाईंड साहिल पोळेकर आणि त्याच्या साथीदारांना धनंजय वटकर आणि सतीश शेडगे या दोघांनी पिस्तूल पुरवल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही आरोपींना बुधवारी गुन्हे शाखेने अटक केली होती.
हे वाचलं का?
आरोपींनी मुळशी परिसरात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला होता. त्या गोळीबाराची ठिकाणे शोधायची आहेत. तसेच मोबाईलमध्ये नवीन सीमकार्ड टाकून आरोपींनी काही लोकांशी संपर्क साधला होता, त्या लोकांचा शोध घ्यायचा आहे. त्याचसोबत ज्या रिक्षातून आरोपींनी पळ काढला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करायची आहे. यासह अटकेतील आरोपींचाही शोध घ्यायचा आहे. अशी सर्व मागणी करून गुन्हे शाखेचे सहआयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत सात दिवसाची वाढ केली आहे.
जुन्या वादातून काढला काटा
मुना उर्फ साहिल पोळेकर यांचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांडले यांचा शरद मोहोळशी जुना वाद होता. या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भाचा मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याच्याद्वारे हत्येचा कट रचला होता. या हत्येसाठी साहिलने चारच महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. या पिस्तुलातून गोळीबार करण्याचा त्याने अनेक महिने सराव देखील केला होता. या दरम्यानच मामा नामदेव कानगुडे यांनी त्यांचा शरद मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आला होता. टोळीत प्रवेश केल्याचे काही दिवसातच तो शरद मोहोळ सोबत फिरायला लागला होता. शरद मोहोळ ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायचा, त्या त्या ठिकाणी मुन्ना पोळेकर हजर राहायचा. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच मुन्ना शरद मोहोळच्या जवळ पोहोचला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mla Disqualification : ‘या’ पाच कारणांमुळे ठाकरेंच्या विरोधात लागला निकाल!
शरद मोहोळसोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा. मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही. त्यात शुक्रवारी शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे शरद मोहोळ त्याची घरी गेला आणि दुपारी घरात जेवण केल्यानंतर तो पत्नीसह दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघाला होता. या दरम्यान शरद मोहोळच्या सुरक्षेसाठी आरोपी वगळता दोघेच असल्याचे पाहुन मुन्नाने डाव साधला आणि शरद मोहोळ घराबाहेर पडताच त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे टोळीत प्रवेश केल्याच्या 25 दिवसातच त्याने शरद मोहोळचा गेम केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT