साईनगरी हादरली! शिर्डीत जावयाने सासरच्या तिघांना संपवलं, पहिला वार पत्नीवर

ADVERTISEMENT

murder case husband killed wife two other murder three member seriously ahmednagar shirdi savalivehi
murder case husband killed wife two other murder three member seriously ahmednagar shirdi savalivehi
social share
google news

Shirdi Crime : पती-पत्नीतील वाद टोकाला गेल्यानंतर काय होते त्याचं चित्र आज साईनगरी (Sainagari) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत घडले आहे. पत्नी कायम माहेरी जाते असते म्हणून तिच्याबरोबर कायम वाद घालणाऱ्या नवऱ्याने आज टोकाचे पाऊल उचलले. पत्नीचा राग मनात धरुन जावयाने सासरी जाऊन पत्नीसह मेहुणा, आजीवर चाकूचे वार (attack) करुन त्यांची हत्या केली आहे. तर सासू, सासरे आणि मेहुणीवर चाकुचे वार केल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्यातील जखमींना शिर्डीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (murder case ahmednagar shirdi in savalivehi husband killed wife two other murder three member seriously)

काही क्षणात संपवलं

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ सावळीविहीर येथे जावयाने पत्नीबरोबरच्या झालेल्या वादातून सासरच्या तिघांची हत्या केली आहे. जावयाने केलेल्या हल्ल्यात वर्षा सुरेश निकम (पत्नी), रोहित चांगदेव गायकवाड (मेहुणा), हिराबाई ध्रुपद गायकवाड (आजी सासू) अशी मृतांची नावे आहेत. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पाच तासाच्या आत सुरेश निकम या मुख्य आरोपीला अटक करुन त्याच्याबरोबर गेलेला त्याच्या चुलत भावालाही नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा >> नववीच्या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका, क्षणात होत्याच नव्हतं झालं, डॉक्टर म्हणाले…

पती-पत्नीचे वाद टोकाला

या घटनेबद्दल पोलिसांनी सांगितले की, संगमनेरच्या रोशन निकम याचा सावळीविहीरमधील वर्षा गायकवाड यांच्याबरोबर विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर त्या दोघांमध्ये वाद होत राहिले. सुरेश आणि वर्षा या दोघांमध्ये वाद झाले की, वर्षा माहेरी निघून जात होती. त्यानंतर तिची समजूत काढून सुरेश पुन्हा घेऊन येत होता. मात्र दिवसेंदिवस वाद वाढत गेले आणि त्यांच्या नात्यामध्ये वितुष्ठ येत गेले. पती-पत्नीचे वाद टोकाला गेल्यानंतर मात्र वर्षाच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्याचा वाद टोकाला गेल्यानंतर वर्षाने सुरेशविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

झोपेत असताना हल्ला केला

सुरेश आणि वर्षाचा वाद पोलिसात गेला तरीही त्याने वर्षाला पुन्हा सासरी बोलवले होते. मात्र वर्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ती माहेरी येत नाही कारण तिला तिच्या माहेरची लोकं पाठीशी घालत आहेत असा संशय त्याच्या मनात होता. तो राग मनात धरुनच त्याने 20 सप्टेंबर रोजी चाकू घेऊन तो सावळीविहीरला गेला. सुरेश निकम आपल्या सासरीवाडीला रात्री अचानक गेला होता. रात्री साडे अकरानंतर तो सासरीवाडीला गेल्यामुळे सासरचे लोकं झोपली होती. सासरीवाडीत जात त्याने पत्नीच्या घराचे दार ठोठावले आणि दार उघडताच दिसेल त्याला चाकूने भोसकण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> Mumbai Crime : …अन् 14 वर्षाच्या मुलीवर टॅक्सीमध्ये केला बलात्कार

पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या

सुरेश निकमने सासरच्या सहा जणांवर चाकूने वार केल्याने त्यामध्ये पत्नी, मेहुणा आणि आजीसासूचा जागीच मृत्यू झाला. तर सासू-सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर सुरेश निकमने घटनास्थळावरुन पळ काढला. तिघांची हत्या झाल्याचे आणि तिघेजण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांना सांगताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर माहिती घेऊन पोलिसांनी नाशिकमधून आरोपी आणि त्याच्याबरोबर आलेल्या भावाला ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT