Shraddha Walkar : ‘आफताबने गळा दाबून मारले, नंतर…’, वडिलांनी कोर्टात काय सांगितलं?
दिल्लीतील साकेत न्यायालयात श्रद्धा वालकरच्या वडिलांची उलट साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांनी आफताब पूनावालानेच श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT

Shraddha Walker Aftab Poonawalla Story : वसईच्या श्रद्धा वालकर या तरुणीसोबत काय घडलं, हे देशात पोहोचलंय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरची हत्या केली गेली होती. आणि त्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. या हत्याकांडप्रकरणी साकेत न्यायालयात श्रद्धाच्या वडिलांची आणि भावाची साक्ष नोंदवली गेली. यादरम्यान श्रद्धाच्या वडिलांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. (shraddha walker father said in the court that Aftab strangulated her with his own hands)
उलटतपासणीदरम्यान, श्रद्धा वालकरच्या वडिलांनी सांगितले की, आफताबने पोलीस ठाण्यात सांगितले की, त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले.
Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…
श्रद्धा वालकरच्या वडिलांनी उलटतपासणी दरम्यान सांगितले की, आफताब तिला मारहाण करत असे श्रद्धाने तिच्या आईला आणि मला सांगितले होते. याशिवाय महाराष्ट्र पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा तक्रार दाखल केली. दिल्लीतील साकेत न्यायालयात शुक्रवारीही या प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार आहे.
काय आहे श्रद्धा खून प्रकरण?
मुंबईत राहणारी श्रद्धा वालकर बंबल या डेटिंग अॅपच्या माध्यमातून आफताब पूनावालाला भेटली. दोघांमधील संवाद वाढला आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, श्रद्धाचे कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते.