सिद्धू मुसेवाला हत्या : करण जोहरही होता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर; महाकाळची धक्कादायक माहिती
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत खळबळजनक दावा केलाय. चित्रपट दिग्दर्शक करण जोहर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता, असा दावा सौरभ महाकाळने आपल्या चौकशीत केला आहे. त्यांच्या या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आलेली नाही. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली. त्याच्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये पोलिसांना काही […]
ADVERTISEMENT

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत खळबळजनक दावा केलाय. चित्रपट दिग्दर्शक करण जोहर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता, असा दावा सौरभ महाकाळने आपल्या चौकशीत केला आहे. त्यांच्या या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आलेली नाही.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली. त्याच्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये पोलिसांना काही जणांवर संशय असून, त्यात पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे यांचा समावेश आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता. दोघेही २०२१ पासून फरार होते. संतोष जाधव याने राण्या बाणखेले याची हत्या केली होती. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता.
अखेर त्याला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तर सौरभ महाकाळ याला मकोका गुन्ह्यातील आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेली आहे.